प्रतिनिधी
मेसर्स स्टोरेज माइल्स (GSTIN: 27BCQPG7380A1ZJ) आणि मेसर्स कॅटबस (GSTIN: 27AZIPP2044A1ZP) यांच्या व्यावसायिक गतिविधी हाताळण्यासाठी जबाबदार असलेल्या एका प्रमुख व्यक्तीला सीजीएसटी( केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालय ) नवी मुंबईने 17 नोव्हेंबर 2022 रोजी अटक केली.
बोगस/बनावट संस्थांकडून प्राप्त 20.96 कोटी रुपयांचे ( 10.48 कोटी रुपयांचा लाभ आणि 10.48 कोटी रुपये मंजूर) बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी ) लाभ/वापर/मंजूर करणे, या आरोपांखाली त्याला अटक करण्यात आली आहे. उपरोक्त व्यक्तीचा साथीदार असलेल्या मालक/चालकाला 16 नोव्हेंबर 2022 रोजी अटक करण्यात आली होती.वरील फर्म्सच्या मालक/चालकाला अटक केल्यानंतर, नवी मुंबईच्या केंद्रीय उत्पादनशुल्क आणि सीजीएसटी करचुकवेगिरी प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या पथकाने दुसऱ्या आरोपीविषयी आवश्यक माहिती गोळा केली आणि योग्य पाळत ठेवून त्याला अटक केली. उपरोक्त कंपन्यांनी 10.48 कोटी रुपयांचा आयटीसी आयटीसी लाभ आणि वापर केला, कोटी जे बोगस/बनावट संस्थांकडून बोगस पावत्याच्या आधारे प्राप्त आणि मंजूर झाले. वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न झालेल्या एकूण बोगस पावत्यांची रक्कम 117 कोटी रुपये आहे.
सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 132(1) (ब ) आणि (क) च्या कलम 132(1) (l) सह तरतुदींनुसार, जर करदात्याने वस्तू किंवा सेवा किंवा दोन्हीचा पुरवठा न करता पावत्या आणि/किंवा बिले जारी केली तर चुकीच्या पद्धतीने इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेणे किंवा त्याचा वापर करणे किंवा अशा पावत्या किंवा बिल वापरून इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणे तसेच वर नमूद केलेल्या कोणत्याही गुन्ह्यासाठी प्रयत्न करणे किंवा त्यासाठी प्रयत्न करणे, कलम 132(1) (i) करदात्याला पाच वर्ष किंवा त्यापेक्षा अधिकच्या कारावासासाठी आणि दंडास पात्र ठरवते. याखेरीज कलम 132(5) नुसार विनिर्दिष्ट केलेले गुन्हे दखलपात्र आणि अजामीनपात्र आहेत.
दुसऱ्या आरोपीला केंद्रीय वस्तू व सेवा कायदा, 2017 च्या कलम 69 (1) नुसार, या कायद्याच्या कलम 132 (1)(ब ) आणि (क ) अंतर्गत गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली असून त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी,वाशी यांच्यासमोर बेलापूर येथे येथे 17.11.2022 रोजी हजर करण्यात आले. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.