• Home
  • क्राईम
  • गणपती उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी बारामती शहर पोलीस स्टेशनकडून बारामती शहरातील चार गुन्हेगारांना केले तडीपार
Image

गणपती उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी बारामती शहर पोलीस स्टेशनकडून बारामती शहरातील चार गुन्हेगारांना केले तडीपार

प्रतिनिधी

आगामी गणेश उत्सव, नवरात्री हे सन शांततेत पार पाडण्यासाठी बारामती शहर पोलीसांनी बारामती शहरातील रेकॉर्ड वरील गुन्हे गार तसेच सार्वजनिक शांतता भंग करणारे उपद्रवी यांची यादी तयार केलेली असून त्यांचे विरूद्ध मोठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे नियोजन बारामती शहर पोलीसांनी आखलेले असून असे काही उपद्रवी इसम असतील त्यांची नावे सुद्धा पोलीस स्टेशनला कळविण्यात वावत पोलीसांनी नागरीकांना अहवान केले आहे.

त्याबाबत बारामती शहरतील १ हर्षद उर्फ हर्षा राजु वागवान रा • आमराई बारामती २. पिन्या उर्फ अमर सुनिल सोनवणे रा. आमराई वारामती ३ अमोल राजू कांबळे रा. आमराई बारामती ४ ऋतिक उर्फ विधूर मनोज लालविगे रा. दुर्गा टॉकीज बारामती यांचे विरूद्ध गर्दी मारामारी, चोरी, खंडणी, असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्यांचे विरूद्ध बारामती शहर पोलीस स्टेशन मार्फत तडीपार करण्याचा प्रस्ताव मा. पोलीस अधिक्षक सो पुणे ग्रामीण यांना सादर करण्यात आलेला होता त्याचे अवलोकन करून मा. अंकीत गोयल सो पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांनी इसम नामे हर्षद उर्फ हर्षा राजु बागवान रा. आमराई बारामती २. पिन्या उर्फ अमर सुनिल सोनवणे रा. आमराई बारामती ३ अमोल राजू कांबळे रा. आमराई बारामती ४ ऋतिक उर्फ विधूर मनोज लालबिगे रा. दुर्गा टॉकीज बारामती यांना पुणे ग्रामीण जिल्हातील बारामती, पुरंदर, दौंड, इंदापुर, हवेली, पुणे शहर, पिंपरी चिंचवड व सातार जिल्हातील फलटण तालुका असे त्यांना सहा महिण्यासाठी हद्दपार करण्यात आलेले आहे.

सदर कार्यवाही मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे सो यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, पोलीस कॉन्स्टेबल अजीत राऊत यांनी सदरची कामगीरी केलेली आहे.

Releated Posts

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026