Skip to main content

  • Home
  • माझा जिल्हा
  • बारामती, पुणे-श्री. प्रदिप ढुके यांची मावळा जवान संघटनेच्या राष्ट्रीय शिवदुर्ग संवर्धन समीती अध्यक्षपदी नियुक्ती.
Image

बारामती, पुणे-श्री. प्रदिप ढुके यांची मावळा जवान संघटनेच्या राष्ट्रीय शिवदुर्ग संवर्धन समीती अध्यक्षपदी नियुक्ती.

प्रतिनिधी

350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त मावळा जवान संघटना आयोजित पहिली राष्ट्रीय मावळा परिषद व छत्रपती शिवाजी महाराज “ए ग्रेट वर्ल्ड लीडर” या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन साने गुरुजी स्मारक पुणे येथे मा.श्रीमंत शिवाजीराजे भोसले प्रिन्स ऑफ तंजावर, तमिळनाडू .व्यंकोजीराजे शहाजीराजे भोसले यांचे वंशज,यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यांना बारामती आणि इंदापूर तालुका संघटने कडून चांदीची राजमुद्रा देऊन सन्मान करण्यात आला.

मावळा जवान संघटनेचे बारामती तालुका अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन,गडकोट स्वच्छता,गडकोट मोहीमेच्या माध्यमातून दुर्गसंवर्धनासाठी योगदान देऊन, छत्रपती शिवाजी महाराज यांनी जगातील पहिल्या लोकशाहीवादी स्वतंत्र राष्ट्राची हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली.भारतासह विश्वाला स्वातंत्र्याची प्रेरणा दिली.

शिवरायांचे गडकोट,जलदुर्ग,भुईकोट हे राष्ट्र भक्तीचे स्फुर्तीस्थान आहे. शिवरायांचा मानवतावादी लोककल्याणकारी कार्याचा, शौर्याचा वारसा गडकोटांना आहे.अनेक गडकोटांचा वारसा संवर्धनाअभावी लुप्त पावत चालला आहे.

गडकोटांच्या संवर्धनातुन शिवरायांच्या राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश नव्या पिढीत जागृत व्हावा. यासाठी मावळा जवान संघटनेच्या राष्ट्रीय शिवदुर्ग संवर्धन समीतीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडीचे पत्र इतिहास लेखक,संशोधक अध्यक्ष मावळा जवान संघटना श्री दत्ताजी नलावडे ,मा.श्रीमंत शिवाजीराजे भोसले प्रिन्स ऑफ तंजावर, तमिळनाडू व्यंकोजीराजे शहाजीराजे भोसले यांचे वंशज,आमदार भीमराव तापकीर साहेब,

छत्रपती शिवाजी महाराजांना मोलाची साथ देणाऱ्या महाराष्ट्र देशभरातील अठरापगड जातीच्या मावळ्यांचे वारसदार,रोहित नलावडे युवक अध्यक्ष,

सौ.अर्चनाताई सातव अखिल भारतीय मराठा महासंघ, नितीनजी मांडगे(शिवम फोटो वर्ल्ड) सोशल मीडिया प्रमुख,

शुभम जामदार,सौरभ देशपांडे,रमेश मरळ-देशमुख,दत्तात्रय हरिहर,सौ.दिपालीताई जाधव,सौ.अर्चनाताई ढुके,उपस्थित होते.

Releated Posts

निरा–बारामती मार्गावरील एसटी चालकांच्या गैरवर्तनाच्या तक्रारी; कारवाईची मागणी

प्रतिनिधी मानवाधिकार संरक्षण समितीचे बारामती आगार व्यवस्थापकांना निवेदन निरा–बारामती मार्गावर सेवा देणाऱ्या काही एसटी बसचालकांकडून प्रवाशांशी उद्धट वर्तन,…

ByBymnewsmarathi Aug 11, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी- अक्षय थोरात उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

 प्रतिनिधी :   उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026