बारामती ! अपघातात मृत्यू झालेले तेजस कासवे याला न्याय मिळावा व अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी याकरिता भारतीय जनता पार्टी कडून नगरपालिका व पोलिस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

प्रशासकीय भवन समोर झालेल्या अपघातात तेजस विजय कासवे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर सर्वच स्तरावर या विषयावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या यानंतर अपघात स्थळावरच्या दुभाजकामधील झाडांची छाटणी करण्यात आली, परंतु अपघात स्थळावरचा खड्डा मात्र अजूनही जैसे-थे आहे यासह विषयावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बांधकाम व उद्यान विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी यासाठी विविध पक्ष संघटनेच्या माध्यमातून मुख्याधिकारी नगरपालिका,आरटीओ विभाग, महसूल विभाग, पोलीस प्रशासन यांना निवेदने देण्यात आली.

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पुणे जिल्हा सरचिटणीस वैभव सोलनकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे केली यावेळी वैभव सोलनकर,जगदीश कोळेकर,विधीज्ञ ज्ञानेश्वर माने यांची मुख्याधिकारी यांच्यासोबत खडाजंगी झाली व बारामती शहरातील ठिकठिकाणी तयार झालेले अपघात स्थळे, दुभाजकामधील झाडे,मोकाट जनावरे,चौका-चौकात पडलेले खड्डे यावर उहापोह झाला.

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा सौ अंकिता पाटील ठाकरे यांनी पोलीस उपाधीक्षक गणेश इंगळे यांना तात्काळ फोनवरून चर्चा करून संबंधितांना न्याय देण्याची मागणी केली.

पोलीस प्रशासन,परिवहन विभाग,महसूल विभाग यांनी संयुक्त बैठक आयोजित करून सर्व हायवा चालक-मालकांची बैठक तात्काळ घ्यावी व यामध्ये विविध नियमांची माहिती देऊन त्याची कठोर अंमलबजावणी करावी अन्यथा भारतीय जाणता पार्टी युवा मोर्चा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस वैभव सोलणकर यांनी म्हटले आहे .

यावेळी सुरज खोमणे,अनिकेत कासवे,नेमाजी वायसे,विशाल पवार, मयूर अक्षय देवकाते उपस्थित होते.