• Home
  • इतर
  • बारामती ! डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जि. प. प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर येथे बहुजन हक्क परिषद च्या वतीने वाचन व चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न.
Image

बारामती ! डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जि. प. प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर येथे बहुजन हक्क परिषद च्या वतीने वाचन व चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ . ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त व वाचन प्रेरणा दिनाच्या पार्श्वभूमीवर वडगाव निंबाळकर जि. प. प्राथमिक शाळा १ व २ याठिकाणी वाचन कला व चित्रकला स्पर्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्याने वडगाव निंबाळकर गावातील जिल्हा परिषदेचे शाळांसाठी या स्पर्धेतील गुणवत्त विद्यार्थ्यांना प्रमाण पत्र , मेडल , हे कार्यक्रमाचे अध्यक्ष बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक सुनीलतात्या धीवार हे होते तर प्रमुख पाहुने म्हणून जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते पाटील हे होते. मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले .

यावेळी वडगाव निंबाळकर गावचे उपसरपंच संगिताभाभी शहा यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांसाठी दप्तर वाटप करण्यात आले . या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक कन्हेरे साहेब व वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत उपसरपंच संगीताभाभी शहा ह्या उपस्थित होत्या . कार्यक्रमा वेळी इंटरनॅशनल जादूगार शिवम यांचे जादूचे शो विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. कार्यक्रमा दरम्यान मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यादरम्यान मान्यवरांच्या बोलण्यातून हे विद्यार्थी हेच पुढील आपले भारताचे भवितव्य आहे विद्यार्थ्यांनी खूप मन लाऊन अभ्यास करा व या जिल्हा परिषद शाळेचे नाव लौकीक करा असे संबोधण्यात आले . यामधून विद्यार्थ्यांना खूप काही असे शिकायला मिळाले. या कार्यक्रमाचे आयोजन बहुजन हक्क परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष नानासाहेब मदने व बारामती तालुका अध्यक्ष अमोल गायकवाड यांच्यावतीने करण्यात आले होते.

या कार्यक्रम वेळी , पै माणिकआबा काळे , किसनराव बोडरे , सौ छाया भंडलकर , राहुल जाधव व तानाजी जाधव अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती शाळा १ व २ वडगाव निंबाळकर , पांडाशेठ घळगे, अनिल कदम , सौ.उर्मीलाताई मदने , सूर्यकांत बोडरे, चांगदेव भंडलकर , वडगाव निंबाळकर मा सदस्य संजय साळवे , अजित भोसले, राहुल आगम, सारिका खोमणे , प्रमोद किर्वे , मा.सदस्य दत्तात्रय खोमणे , कोराळे खुर्द ग्रा.पं.सदस्य सुरज खोमणे, अलका भंडलकर , सुनीताताई घळगे , शिवाजी खोमणे , मनोज साळवे, जादूगार शिवम, संतोष डूबल , अप्पा भंडलकर आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्यध्यापिका कविता जाधव मॅडम आणि आगम मॅडम यांनी मान्यवरांचे आभार मानत सत्कार केला यावेळी दोन्ही शाळेचे शिक्षक , शिक्षिका , आदी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गवळी सर यांनी केले व आभार अमोल गायकवाड यांनी मानले .

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025