मुख्य मजकुरावर जा
Monday, 21 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 22 October 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

बारामती ! नवरात्रोउत्सवानिमित्त रायझिंग स्टार इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये महाभोंडला उत्साहात .

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
October 22, 2023 1 मिनिट वाचन 8,533 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

वडगाव निंबाळकर रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नवरात्र उत्सवानिमित्त महाभोंडला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . भोंडला हे हस्त नक्षत्रात येत असून हत्तीची पूजा केली जाते म्हणून हत्तीच्या प्रतिमा काडून त्याची पूजा करण्यात आली . यावेळी जागर नवदुर्गांचा हा सन्मान पुरस्कार विविध शेत्रामध्ये कार्यरत असलेल्या महिलांना देण्यात आला . यावेळी रिंकल आवटे (उद्योजिका ) , स्मिता दुमने (विद्युत सहाय्यक ) , मयुरी साळवे (अंगणवाडी शिक्षिका ) माया गलांडे (नियत क्षेत्र अधिकारी) , श्रद्धा गायकवाड( उद्योजिका), अश्विनी राणे ( पोलिस) , यास्मिन सय्यद ( एचडीएफसी बँक कर्मचारी ) , गौरी खुडे (परिचारिका) , माधुरी सस्ते ( यशस्वी महिला शेतकरी ) या नवदुर्गांना सन्मानित करण्यात आले .

महिलांसाठी आयोजित केलेल्या महाभोंडल्याच्या कार्यक्रमात विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांनी आनंदाने व उत्साहाने दांडिया, गरबा या खेळांचा मनसोक्त आनंद घेतला . कार्यक्रमा वेळी इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालक सीताबाई काटे , अध्यक्ष कांचन काटे मॅडम , प्रिन्सिपल श्रद्धा म्हसकर , दिपाली नलावडे , पूजा गाढवे , कांचन साळवे , उपस्थित होत्या .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली चव्हाण मॅडम यांनी केले तसेच आभार प्रदर्शन कांचन काटे मॅडम यांनी मानले .

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख