बारामती ! वडगाव निंबाळकर स्वातंत्र्य विद्या मंदिर मधील विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेत यश .

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे, या ठिकाणी झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वडगांव निंबाळकर मधील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केले असून सदर विद्यार्थ्यांची चंद्रपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेमध्ये उतीर्न झालेल्या 17 वर्षे वयोगट मुली –

1.कु.अनिता लालासो ठोंबरे-200 मीटर धावणे- (प्रथम क्रमांक)

2. 4 × 100 मीटर रिले धावणे (प्रथम क्रमांक)
1.श्रुती संतोष गायकवाड
2.अनिता लालासो ठोंबरे
3.संध्या लालासो ठोंबरे
4.वनिता लालासो ठोंबरे
5. तृप्ती अरविंद साळुंखे

3. 4 × 400 मीटर रिले धावणे (प्रथम क्रमांक)
1.अनिता लालासो ठोंबरे
2.संध्या लालासो ठोंबरे
3.वनिता लालासो ठोंबरे
4.श्रुती संतोष गायकवाड
5.पोर्णिमा अनिल खोमणे

4 . 19 वर्षे वयोगट मुलांमध्ये
कु. आयान अमजद शेख- हॅमर थ्रो मध्ये (व्दितीय क्रमांक) मिळवला आहे .

यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे प्राचार्य , सर्व शिक्षक , पर्यवेक्षक पाबळे सर, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद किर्वे, सौ.किर्वे मॅडम, राजे उमाजी नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनिल खोमणे, पत्रकार संतोष भोसले यांनी व पंचक्रोशीतील सर्व पालक व ग्रामस्थांनी या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला . स्वातंत्र विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थि प्रतेक शेत्रामध्ये यश मिळवत असतात व वडगाव निंबाळकर गावचे आणि शाळेचे नाव लौकीक करतात अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होत असताना दिसत आहे .

या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक चौगुले सर व दरेकर सर यांचे मार्गदर्शन लाभले .