प्रतिनिधी – फिरोज भालदार
संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असतानाच बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर येथे आज सकल मराठा समाजाकडून एकदिवसीय उपोषण करत मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे . यावेळी ग्रामस्थांच्या संतप्त अश्या प्रतिक्रिया उमटल्या. आजपर्यंत जे जे सत्तेवर आले, त्या सर्वांनी राज्यातील मराठा समाजाला हक्काच्या आरक्षणापासून झुलवत ठेवले आहे असे भाषणामध्ये ग्रामस्थांकडून संबोधण्यात आले .
सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी मराठा समाजातील लोकांचा फक्त मतांसाठी वापर करून खोटी आश्वासने दिलेली आहेत. आज मराठा समाजातील मुलं-मुली प्रचंड कष्ट घेऊन शिक्षण घेतात, त्यांच्या प्रयत्नांना यश येईल आणि माझ्या मुलाला सरकारी नोकरी लागेल अशी आशा पालक बाळगून असतात, मुलांना चांगले गुण तर मिळतात पण आरक्षण नसल्याने मराठ्यांना नोकरीपासून वंचित रहावे लागत आहे. याची खंत मराठा समाजातील पालकांना आहे असे ॲड. सचीन गायकवाड यांनी आपले मनोगत वक्त करताना मांडले .
त्यामुळेच बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावच्या ग्रामस्थांनी एकत्रित येऊन एकदिवसीय लक्ष्यनीय उपोषण करत एक मराठा लाख मराठा अश्या घोषणा देत मराठा आरक्षनासाठी उपोषण करण्यात आले . जोपर्यंत मराठा समाजाला सरकार आरक्षण देत नाही, तोपर्यंत गावात राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी प्रवेश करु नये अशा पध्दतीचा निर्णय वडगाव निंबाळकर मराठा समाज ग्रामस्थांनी घेतला आहे .
उपोषणामध्ये वडगाव निंबाळकर होळ ,सदोबाची वाडी, सस्तेवाडी याठीकानाहून मराठा समाज उपस्थित होता. यामध्ये महिलांची देखील जास्त प्रमाणात उपस्थिती होती. याच प्रकारे वडगाव निंबाळकर मध्ये सायंकाळी ७ वाजता क्यांडल मार्च व मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे .
















