प्रसन्न पेट्रोलियम फरांदेनगर येथे सीएनजी सेवा सुरू.

Uncategorized

अनेक वाहन मालकांच्या सेवेसाठी प्रसन्न पेट्रोलियम निंबुत फरांदेनगर येथे सीएनजी सेवा आजपासून दिनांक ०३/११/२०२३ पासुन सुरू झाली असून सीएनजी सेवेचे उद्घाटन श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माजी संचालिका श्रीमती सुमनताई फरांदे व श्री. दिलीपदादा फरांदे संस्थापक अध्यक्ष समता पतसंस्था व माजी व्हा. चेअरमन श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या मातोश्री श्रीमती शकुंतला प्रभाकर फरांदे यांच्या हस्ते करण्यात आले.
अत्यंत साध्या पद्धतीने उद्घाटन करून ग्राहकांच्या सेवेसाठी सीएनजी सेवा तात्काळ सुरू करून दिली अनेक ग्राहकांची त्यामुळे गैरसोय कमी झाली सीएनजी पंप सुरू झाल्यामुळे अनेक ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. निंबुत ,निरा , सोमेश्वरनगर परिसरातील अनेक ग्राहकांना सीएनजी भरण्यासाठी सोय नसल्याने त्यांना लोणंद, जेजुरी, बारामती येथे जावं लागत होते मात्र सदरचा सीएनजी सेवा सुरू झाल्यामुळे ग्राहकांची अत्यंत चांगली सोय झाली असुन माननीय श्री दिलीपदादा फरांदे व त्यांचे चिरंजीव डॉक्टर प्रसन्न फरांदे यांनी पेट्रोल व डिझेलची सेवा उत्तम दिले असल्याकारणाने परिसरात त्यांचे पेट्रोल पंपाचे नाव झाले असून सीएनजी सेवा ही अशीच चांगली मिळेल अशी ग्राहकांच्याकडून अपेक्षा आहे व ते देण्याची व ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरण्याची हमी सीएनजी चे मालक डॉक्टर प्रसन्न फरांदे यांनी दिली. सदर कार्यक्रमास डॉक्टर विक्रम फरांदे, डॉक्टर प्रसन्न फरांदे, श्री दिलीपदादा फरांदे , श्री. मनोज शहा , श्री उत्तमराव आगवणे, श्री अतुल लकडे, हे मान्यवर उपस्थित होते सदरच्या सीएनजी स्टेशनला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या असून सीएनजी स्टेशन चालू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे यात श्री. शहाजीकाका काकडे, श्री आर.एन बापू शिंदे , श्री संभाजी काकडेसर , श्री दत्ताआबा शिंदे तसेच सर्व पत्रकार बंधू आदि मान्यवरांनी सीएनजी स्टेशनला भेट देऊन सीएनजी पंप चालू झाल्यबद्दल समाधान व्यक्त केले.