बारामती ! वडगाव निंबाळकर येथे अवैद्यरित्या व्यवसायांना जोर ; पोलिस प्रशासनाचे मात्र डोळ्यावर हात का ?.

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर या ठिकाणी मटका, ऑनलाईन, चक्री , मुरूम वाहतूक यासारख्या अवैध धंद्यांना जोर असून ग्रामस्थ या धंद्यांवरती संताप्त व्यक्त करीत आहेत . वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरती याप्रकारचे अनेक अवैद्य धंदे चालू असून या ठिकाणी प्रशासन या अवैध धंद्यांवरती कारवाई का करत नाही? हे अवैध धंदे दिवस – रात्र चालूच असतात तरीही प्रशासन या अवैध धंद्यांवरती लक्ष का घालत नाही? हे धंदे शाळांच्या जवळ असून नीरा बारामती रोडवर चालू आहेत तरीही प्रशासन ह्यांच्यावर्ती दुर्लक्ष का करीत आहे ?

याच प्रकारे वडगाव निंबाळकर मध्ये मुरूम, माती ,डबर वाहिला जातो याची परवानगी घेतली जाते का ? वडगाव निंबाळकर गावामध्ये ह्या मुरूम ,माती ,डबर वाहणाऱ्या गाड्यांचे स्पीड देखील कमी नसते ह्याच प्रकारे गावामध्ये सुद्धा गाडी स्पीडने असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावामध्ये शाळा व रस्त्याच्या कडेला घरे असतात या ठिकाणी हे हायवा वाले यांचे स्पीड कमी नसते तरी कोणाला हानी झाली तर याला जबाबदार कोण ? नागरिकांना रस्त्यावर चालणे देखील आवगड झाले आहे . ह्या हायवा वाल्यांवर्ती वडगाव निंबाळकर ग्रामस्थ कंटाळले आहेत. ह्या अवैधरित्या मुरूम , माती , डबर , वाहणाऱ्या गाड्या रात्रंदिवस हा आपला अवैध व्यवसाय करत असतात .

हे धंदे वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरती होत असून देखील प्रशासन यांच्यावर का कारवाई करत नाही ? अशी चर्चा वडगाव निंबाळकर ह्या भागात नागरिकांमध्ये होताना दिसत आहे . स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा आहे की कोणाच्या आशीर्वादाने यांचा अवैद्यरित्या धंदा जोमाने सुरू आहे. या अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्यांना पोलीस प्रशासनाची भीती नाही का ? का प्रशासनच आपले खिसे गरम करून ? त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे . अशी चर्चा वडगाव निंबाळकर ग्रामस्थांकडून होताना दिसत आहे .