बारामती ! वडगांव निंबाळकर येथे ऊस तोडणी कामगारांची दिवाळी केली गोड .

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

सध्या सर्व साखर कारखान्यांसाठी ऊस तोडणी चालू असून ऊस तोडणी कामगार हे आपले गाव सोडून २०० – ३०० किलो मिटर लांब दुसऱ्या गावी राहून आपली उपजीविका करत असतात . त्यांची दिवाळी देखील गोड व्हावी व ऊस तोडणी कामगारांनी दिवाळीचा सण साजरा करावा यानिमित्त बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे ऊस तोडणी कामगार महिलांना साडीचे वाटप व कुटुंबीयांसाठी फराळ वाटप करण्यात आले व बहुजन हक्क परिषदेच्या वतीने ऊस तोडणी कामगार यांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमासाठी बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील धिवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला . या कार्यक्रमासाठी बहुजन हक्क परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे सल्लागार आप्पा भांडवलकर , महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष नानासाहेब मदने ,पुणे जिल्हा युवक अध्यक्ष पांडुरंग घळगे, पुणे जिल्हाध्यक्ष संतोष डुबल, बारामती तालुका अध्यक्ष अमोल गायकवाड, मुढाळे गावचे सरपंच जयपाल साळवे, होळ गावचे सरपंच छाया भंडलकर ,उर्मिला मदने ,अलका भंडलकर ,तेजश्री भंडलकर, सतीश साळवे, सोनू खोमणे,जादूगार शिवम, मंगेश खोमणे वडगाव निंबाकर ग्रामपंचायत सदस्य संजय साळवे, अजित भोसले, राहुल आगम , व ऊस तोडणी कामगार महिलावर्ग व सहकुटुंब उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी अमोल गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले व ऊस तोडी कामगार यांनी बहुजन हक्क परिषदेचे मनापासून आभार मानले .