Skip to main content

  • Home
  • माझा जिल्हा
  • इंदापूरमधील नाथपंथी, डवरी, गोसावी समाजाकडून अनुदानाची मागणी
Image

इंदापूरमधील नाथपंथी, डवरी, गोसावी समाजाकडून अनुदानाची मागणी

प्रतिनिधी

इंदापुर तालुक्यातील नाथपंथी, डवरी, गोसावी कुटुबांना शौचालयासाठी अनुदान दयावे अशी मागणी इंदापुर तालुका नाथपंथी डवरी गोसावी समाज युवा संघटनेच्यावतीने केली आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी इंदापुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली. संजय शिंदे यांनी दिलेल्या निवेदनानुसार इंदापुर तालुक्यामध्ये नाथपंथी, डवरी, गोसावी समाज मोठया प्रमाणात आहे. समाजाला आर्थिक कारणांसह जागेचा प्रश्न आहे. साक्षरता व योग्य ज्ञानाअभावी डवरी गोसावी समाज शासनाच्या स्वच्छ भारत योजनेअंतर्गत शौचालयाच्या अनुदानापासुन वंचित आहे. शौचालय नसल्यामुळे समाजातील व्यक्तींना उघडयावर जावे लागते. त्यामुळे सुरक्षेसह स्वच्छेताचाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे नाथपंथी डवरी गोसावी समाजातील कुटुंबाची आर्थिक स्थिती विचारात घेऊन समाजातील व्यक्तींना शौचालय बांधकामासाठी सरसकट अनुदान मंजुर करावे अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी केली आहे.

Releated Posts

निरा–बारामती मार्गावरील एसटी चालकांच्या गैरवर्तनाच्या तक्रारी; कारवाईची मागणी

प्रतिनिधी मानवाधिकार संरक्षण समितीचे बारामती आगार व्यवस्थापकांना निवेदन निरा–बारामती मार्गावर सेवा देणाऱ्या काही एसटी बसचालकांकडून प्रवाशांशी उद्धट वर्तन,…

ByBymnewsmarathi Aug 11, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी- अक्षय थोरात उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

 प्रतिनिधी :   उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026