• Home
  • इतर
  • रेल्वेत अवैध विक्री अंगलट, 2731 जणांना अटक, कोट्यवधींचा दंड
Image

रेल्वेत अवैध विक्री अंगलट, 2731 जणांना अटक, कोट्यवधींचा दंड

प्रतिनिधी

मध्य रेल्वेत अवैधरित्या खाद्यपदार्थांची विक्री करणे फेरीवाल्यांना अंगलट आले. मध्य रेल्वेकडून या अवैध फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई करण्यात आली. मध्य रेल्वे संरक्षण दलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने एप्रिल ते ऑक्टोबर या सहा महिन्यांच्या कालावधीत अनधिकृत फेरीवाले आणि रेल्वेच्या आवारात अतिक्रमण करणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे. २१ हजार ७४९ प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच २१ हजार ७३६ फेरीवाल्यांना अटक केली. फेरीवाल्यांकडून २.७२ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मागील वर्षी एप्रिल आणि ऑक्टोबर या कालावधीत १७ हजार ९६७ गुन्हे दाखल केले होते. यावर्षी २१ टक्के अधिक गुन्हे दाखल झाले आहे. मध्य रेल्वेच्या पुणे, मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर विभागात ही कारवाई झाली.

रेल्वेत विक्री करणाऱ्यांसाठी लायन्सन गरजेचे आहे. परंतु अनेक जण रेल्वे स्टेशनच्या आउटरवर रेल्वेत फेरीवाले घुसतात आणि खाद्य पदार्थांची विक्री करतात. या फेरीवाल्यांविरोधात मध्य रेल्वेने अभियान सुरु केले. त्यात 21 हजार 749 प्रकरणात 21 हजार 736 जणांना अटक करण्यात आली.

अशी झाली कारवाई

मुंबई विभागात 8,629 जणांवर गुन्हा दाखल झाला. त्यापैकी 8,624 जणांना अटक झाली. त्यांच्याकडून 94.77 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

भुसावळ विभागात 6,349 गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून 1 कोटी 15 लाख रुपये दंड वसूल करण्यात आले.

पुणे विभागात आरपीएफने 1,856 गुन्हे दाखल करत 1,855 जणांना अटक केली. एकूण 12.71 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

सोलापूर विभागात 2,181 जणांना गुन्हा दाखल करण्यात आले आहे. त्यातील 2,178 जणांना अटक झाली. 21.92 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पुणे रेल्वे प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.16 दिवसांत 1 कोटी 83 लाख रुपयांचा दंड पुणे रेल्वे प्रशासनाकडून वसूल करण्यात आला. विशेष मोहिमे अंतर्गत पुणे रेल्वे प्रशासनाकडून फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्या. एक नोव्हेंबर ते सहा नोव्हेंबर दरम्यान 1 कोटी 83 लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025