पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटीत आयोजन*

Uncategorized

प्रतिनिधी.

पुणे, दि. २१: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि सिम्बॉयसिस स्किल ॲण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता सिम्बॉयसिस स्किल ॲण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, सिम्बॉयसिस भवन, शिवाजीनगर, पुणे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध नामांकित उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून ३ हजारापेक्षा अधिक रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. या पदांसाठी किमान दहावी, बारावी, पदवीधर, पदव्युत्तर पदवी, कोणत्याही शाखेचा आयटीआय, पदविका, अभियांत्रिकी अशा विविध शैक्षणिक पात्रताधारकांना रोजगाराची संधी आहे.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी रिक्तपदांबाबत अधिक माहितीसाठी या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने नोंदवावे. रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्ज व आधारकार्डाच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात.

जिल्ह्यातील अधिकाधिक नोकरी इच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.
0000