मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

बारामती ! ‘मोढवे’ गावात मरिमाता मंदिरातील २१ किलोची चांदीची मखर चोरीला.

mnewsmarathi 21 Nov 2023 1 मिनिट वाचन 9,572 वाचन

प्रतिनिधी – फिरोज भालदार

 ‘मोढवे’ याठिकाणी रात्री अज्ञात चोरट्यांनी जागृत देवस्थान अशी प्रसिद्ध असलेली देवीच्या मंदिरातील किमान २० ते २१ किलोची चांदीची मखर चोरून नेल्याची घटना घडली आहे .

बारामती तालुक्यातील ‘ मोढवे ‘ या गावामध्ये प्रसिद्ध व जागृत अशे ओळखले जाणारे मंदिर म्हणजे मरिमाता मंदिर या मंदिरामध्ये रात्री दीडच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मुख्य गृहात प्रवेश करून चांदीचे मखर चोरून नेल्याची माहिती मिळाली. ही घटना पोलिसांना कळताच वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन चे अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले व पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलिस हे करीत आहेत .

या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . नागरिकांमध्ये चर्चा आहे की चोरटे हे देवाचे घरी देखील चोरी करण्यास भित नाहीयेत तर आम आदमी च्या घराचे काय ? असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे .

लेखक

mnewsmarathi

M News Marathi