जेजुरी येथे होत असलेल्या अधीवेशनास मोठ्या संख्येने उपस्थीत रहावे – डाॅ.दत्तात्रय भरणे

Uncategorized

प्रतिनिधी –

पूणे : मौर्य क्रांती महासंघाच्या वतीने प्रतीवर्षाप्रमाणे याही वर्षी २६ आणि २७ नोव्हेबर रोजी राज्यआधिवेशन तथा धनगर जागृती परिषदेच आयोजन करण्यात आले आहे.समाजातील कर्मचारी अधिकारी डाॅक्टर्स ,इंजीनीअर्स ,वकील , व्यवसायीक , विविध संस्थेत कार्यरत पदाधीकारी ,शिक्षीत युवा , महिला यांनी मोठया संख्येने उपस्थीत राहण्याचै आवाहन मौर्य क्रांती महासंघाचे पूणे जिल्हाध्यक्ष डाॅ.दत्तात्रय भरणे यांनी केले.

मागच्या अनेक वर्षापासुन पे बॅक टु सोसायटी ही भावना समाजातील बुध्दीजीवी वर्गात रूजून तीचा विकास झाला पाहीजे.आपण समाजाचे देणे लागतो.समाजाचे आपल्यावर उपकार आहेत.ते आपण आपले स्वत: चे सर्व कामे करून कौटंबीक जबाबदार्या पार पाडून समाजासाठी मिळेल तो वेळ सामाजीक कार्यासाठी दिला पाहीजे यातूनच सामाजीक परिवर्तनाची एक प्रगतीकडे जाणारी पाऊलवाट मिळेल .शैक्षणिक ,सामाजीक ,सांस्कृतीक दृष्टया समाजमनं प्रगल्भ झाली पाहीजेत या साठी सतत कार्यरत असलेल संघटन म्हणजे मौर्य क्रांती महासंघ .जेजुरी या ठिकाणी होत असलेल अधिवेशन संस्थापक अध्यक्ष बलभिम माथेले यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे .दोन दिवस होत असलेल्या अधिवेशनाची सुरूवात २६ नोव्हेबर वार रविवार रोजी सायं ७ वा.लोकशाहीर सागर माने यांच्या सामाजीक प्रबोधनाच्या कार्यक्रमाने होईल.या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री मल्हारी मार्तड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त यांच्या शुभहस्ते होईल.या कार्यक्रमाची अध्यक्षता महाराष्ट्र लोकशाहीर राज्य परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कामगार नेते आप्पासाहेब खताळ हे करतील .२७ नोव्हेबर रोजी सकाळी ७ वा पु.अहिल्यामाई होळकर यांच्या प्रतीमेच पुजन करून महाराष्ट्र राज्य मुक्त पत्रकार विकास संघ चे अध्यक्ष मा.रमेश लेंडे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलीत केली जाणार आहे .

सकाळी ९ ते ११ या वेळेत शिक्षणातून समृध्दीकडे या विषयावर टीच फाॅर इंडीया स्काॅलर अमोल शिंगाडे , आमची लोकदैवतं आमची महान दैदीप्यमान विरासत या विषयावर महानायक खंडोबाचे लेखक संचीत धन्वे , स्री युवा नेतृत्व व त्या पूढील आव्हाने या विषयावर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापिठातील इतिहास विभागाच्या डाॅ.स्वर्णमाला मस्के , वाघर विचारांची या विषयावर वाघर चित्रपट निर्माते व दिग्दर्शक राजेद्र बरकडे , आजचा युवा उदयाचे भविष्य: एक चिंतन या विषयावर सावीत्रीबाई फुले विदयापिठाचे प्रा.संतोष तांबे , तुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे? या विषयावर लेखक ,युवा प्रेरणादायी वक्ता राजेश दिवटे , अर्थ साक्षरता : आजची गरज या विषयावर मल्हारी मार्तंड चे संस्थापक अध्यक्ष विशाल देवकते मार्गदर्शन करतील.या सत्राचे प्रास्तवीक महासचिव प्रशिक्षण तुकाराम जानकर करतील तर या सत्राची अध्यक्षता प्रदेशाध्यक्ष राजीव हाके हे करतील
यक सात विषयाचे संचलन गोविंद गोचडे, मनोहर कोकरे ,इंजी मनिषा दुगाने, सुरेश शिंदे, डाॅ.दत्तात्रय भरणै , प्रा.जी
के सुर्यवंशी ,साईनाथ बंडगर तर आभार दिवाकर कुकडे, कालीदास चोरमले,शैलाताई नवघरे,डाॅ.रमजान तांबोळी , राजकुमार नव्हाळे , किरण मासुळे करणार आहेत. हे सात ही विषय चर्चेसाठी ठेवण्यामागचा निश्चीत असा उद्देश.आहे .अतिशय अभ्यासपूर्ण विचार ९ ते ११ या वेळेत होणार्या पहिल्या सत्रात ऐकायला मिळणार आहेत.

या अधिवेशाच्या दुसर्या सत्राची म्हणजे उद्घाटन सत्राची सुरूवात ११ वा वेळेत होणार आहे.या अधिवेशनाचे उद्घाटन पेरीयार प्रबोधीनी चे अध्यक्ष तथा मार्गदर्शक मौर्य क्रांती महासंघाचे इंजी.शिवाजीराव शेंडगे हे करतील
चांगभल होईल .या सत्रात राज्यस्तरीय दोन पुरस्कार सत्यशोधक विचाराचे अनुयायी मारोतरावजी पिसाळ मामा यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार आहेत
सत्यशोधक प्रबोधनकार राज्यस्तरीय पुरस्कार सप्तखंदेरी निर्माते तथा राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना देवून सन्मानीत केले जाणार आहे .दूसरा सत्य समाज प्रवाहक पुरस्कार राष्ट्रीय समाज कर्मचारी फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष मा
सिध्दाप्पा अक्कीसागर यांना देवून सन्मानीत केले जाणार आहे .याच कार्यक्रमात वर्षभर.घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील सात विजेत्यांचा सन्मान करणार आहोत.सर्व पारितोषीक कै.दाजी बाळू होनमाणे यांच्या स्मरणार्थ आनंदा होनमाणे यांच्याकडून दिले जाणार आहेत
याच सत्रात आदर्शग्राम ढोरखेडा ता.मालेगाव जि.वाशीम.च्या सरपंच सौ.सुनीता ताई बबनराव मिटकरी यांचा ही सन्मान करण्यात.येणार आहे .विविध क्षेत्रातील मान्यवर आरोग्य , शिक्षण, पत्रकारीता , उदयोजक या क्षेत्रातील नामवंताचाही सन्मान केल्या जाणार आहे
या सत्रात महाराष्ट्रातील नामवंत अभ्यासक उदयोजक प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थीत राहतील तर या सत्राची अध्यक्षता बलभिम माथेले हे करणार आहेत.या सत्राचे संचलन उपाध्यक्ष प्रकाश कुटे करतील सर्वाचे आभार संतोष गावडे मानतील.

या सत्राचे विषय विचार परिवर्तन सर्व परिवर्तनाचे मूळ आहे व.समाज परिवर्तनाच्या कार्यात बुध्दीजीवी वर्गाची भुमीका हे असतील हे दोन्ही विषय धनगर बहुजन समाजाच्या सर्व.प्रकारच्या परिवर्तनाची नांदी ठरणारे आहेत.
तिसरे प्रबोधन सत्र हे २.३० ते ५ या वेळेत संपन्न हईल.या समारोपीय सत्राचा विषय एकटयाने नाही तर एकीने लढूया या सिध्दांतावर काम करणे हेच आपल्या सर्व समस्येचे समाधान आहे : एक चिंतन .हा आहे .या विषयावर महाराष्ट्र व इतर राज्यातील विविध सामाजीक संघटनेचे पदाधीकारी आपले विचार व्यक्त करतील .या सत्राची अध्यक्षता प्रदेश प्रभारी ॲड उत्तमभाई कोळेकर करतील. या सत्राचे संचलन सत्यवान दुधाळ करतील व आभार डाॅ.प्रवीण जगताप हे मानतील.

या अधिवेशानासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्राच्या सर्व विभातील धनगर बहुजन समाजातील पदाधीकारी अधिकारी तसेच विविध सामाजीक संस्थाचे विश्वस्थ उपस्थीत राहतील
तरी पूणे जिल्हयातील धनगर बहुजन समाजातील कर्मचारी अधिकारी तसेच विविध क्षेत्रात कार्य करणार्या ,सामाजीक कार्य करणार्या सर्वाना विनंती आहे की या अधिवेशनाला तथा राज्यस्तरीय धनगर परिषदेला मोठया संख्येने उपस्थीत रहावे.