या मोहिमेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होऊन शूरवीर मावळ्यांचा इतिहास पुढील येणार्या पिढीने जपावा,म्हणून सदर गड-किल्ले बांधणी मोहिम मध्ये सहभागी आणि योगदान देणाऱ्या आताच्या पिढीतील मावळ्यांचे कार्याबद्दल बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील महेश काटे आणि धणे वस्ती येथील उपक्रमातील सर्वानी उत्कृष्ट असा जंजिरा किल्ला बनविला तसेच हनुमान नगर माळेगाव येथील संकेत प्रकाश सातव,सातव वस्ती जय शेंडगे, अविष्कार जाधव, श्रेयस जाधव,तेजस जराड, त्यांचा सन्मान श्री प्रदीप ढुके संस्थापक,अध्यक्ष स्वराज प्रतिष्ठान, अध्यक्ष मावळा जवान संघटना बारामती,शिवदुर्ग संवर्धन समिती,दत्ता हरिहर,रमेश मरळ(देशमुख),अर्चनाताई सातव शहर अध्यक्षा अखिल भारतीय मराठा महासंघ बारामती,शिवाजी घाडगे,प्रकाश सातव हे उपस्थितीत होते. मुलांनी गड किल्ले बांधले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आणि अशाच पद्धतीने महान थोर पुरुषाचे विचार आचरणात आणून पुढील पिढीला आदर्श निर्माण करून इतिहासिक विचार जपले पाहिजे असे मोलाचे विचार मांडून मार्गदर्शन श्री प्रदीप ढुके यांनी केले.