• Home
  • क्राईम
  • पोलिसांवर गोळीबार करुन पसार झालेला दरोडेखोर जेरबंद; पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यात गुन्हे
Image

पोलिसांवर गोळीबार करुन पसार झालेला दरोडेखोर जेरबंद; पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यात गुन्हे

प्रतिनिधी

पुण्यासह नगर, सोलापूर जिल्ह्यात घरफोडी, तसेच दरोडा घालण्याचे गुन्हे करणारा दरोडेखोराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. पोलिसांच्या पथकावर गोळीबार करुन पसार झालेल्या दरोडेखाेराला पकडण्यासाठी सोलापूर आणि नगर पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत होते. हडपसर भागात गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला सापळा लावून पकडले. त्याच्याकडून सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हंसराज रणजीतसिंग टाक (वय १८, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या दरोडेखोराचे नाव आहे. गुन्हे शाखेतील युनिट सहाचे पथक हडपसर भागात गस्त घालत होते. त्यावेळी टाक हा कॅनोल रस्ता परिसरात थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी नितीन मुंढे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून टाक याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पुणे शहरातील हडपसर, लोणी काळभोर, लोणीकंद परिसरात घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले. चौकशीत त्याने नऊ गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून, सहा लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट सहाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, सुरेश जायभाय, विठ्ठल खेडकर, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतीक लाहीगुडे, कानिफनाथ कारखेले यांनी ही कारवाई केली.

Releated Posts

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026