संपादक मधुकर बनसोडे.
राज्यात प्राथमिक शाळा काही ठिकाणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे याला खऱ्या अर्थाने जबाबदार कोण. शिक्षक की स्थानिक नेते. स्थानिक नेतेमंडळींची मुले पुणे मुंबई किंवा इंग्लिश मीडियम शाळेत असतात त्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेकडे लक्ष देण्यासाठी फारसा वेळ कधीच नसतो कोण शिकतं जिल्हा परिषद च्या प्राथमिक शाळेत. गोरगरीब वंचित सर्वसामान्य जनतेची मुलं ही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आज 99% शिकत आहेत.
क्वचित एखादा टक्का श्रीमंताचा मुलगा शाळेत दिसतो त्यामुळेच स्थानिक नेते मंडळी जिल्हा परिषद च्या शाळेकडे फिरकत देखील नाहीत 15 ऑगस्ट, 26 जानेवारी या दिवशी झेंडा फडकवण्यासाठी येतील तेवढाच त्यांचा आणि जिल्हा परिषद शाळेचा संबंध येतो. प्राथमिक शाळेतील शिक्षक देखील बऱ्याच वेळा पालकांच्या देखील असे निदर्शनास येते की शाळेतील शिक्षक पालकांना सांगत असतात मुलांना हातात मोबाईल देऊ नका हे खरं आहे की मुलांच्या हातात मोबाईल असल्यामुळे शिक्षणाचा खेळ खंडोबा झालेला आहे मात्र हेच शिक्षक मुलांना शिकवत असताना तासंतास मोबाईल वरतीच असतात. खरंतर अशा शिक्षकांवरती शिक्षण अधिकारी यांनी कारवाई केली पाहिजे. खरंतर शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद च्या शाळेत केव्हा येतात? ते येतात का नाही? हे देखील गुलदस्त्यातच आहे.
शाळेमध्ये स्कूल कमिटी नावाची एक यंत्रणा असते मात्र त्या यंत्रणेमध्ये ज्यांची मुलं त्या शाळेत शिकत नाहीत असे नागरिक त्या स्कूल कमिटीचे सदस्य, अध्यक्ष असतात त्यांची मूलच तिथे शिकत नसतील तर त्यांना काही घेणं देणं नसते, शाळेत कसं शिकवतात, शिकवतात का नाही? मुलांवरती लक्ष आहे का? कित्येक इंग्लिश मीडियम मध्ये जिल्हा परिषद शाळेतून पुढे शिक्षण घेतलेली शिक्षक शिकवण्यासाठी आहेत मग त्याच जिल्हा परिषद शाळेची आज ही दैनिया अवस्था नक्की का? व कुणामुळे झाली? जिल्हा परिषद शाळा ही वाचली पाहिजे, टिकली पाहिजे, मात्र त्यासाठी शिक्षक, पालक, स्थानिक नेते मंडळी यांनी देखील त्या शाळेवर ती लक्ष केंद्रित केले पाहिजे. अन्यथा सर्वसामान्य घरातील मुलांना शिक्षण घेणे खूप अवघड होईल.