सोमेश्वर.करंजे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सोमेश्वर च्या कार्यकारी संचालकांना ऊस तोडीसाठी दिले निवेदन.

Uncategorized

 प्रतिनिधी.

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांना करंजे पंचक्रोशीतील सभासदांनी ऊसतोङी बाबतीत सह्यांचे निवेदन दिले. निवेदनात आसे म्हटले आहे की, 15/6/2022 लागण तारीख आसलेला ऊसास ऊसतोङ चालू करावी.निरा ङावा कालवा चालू अवतरण बंद होणार आहे.गेटकेन पूर्णतः बंद करून सभासदांच्या ऊसास प्रामुख्याने तोङी मिळाव्यात.कपातीच्या नावाखाली पुढील तारखेचा ऊस गाळपास आणून चालू तोङी लांबवू नयेत.तसेच आमच्या करंजे पंचक्रोशीतील सभासदांच्या दर वर्षी ऊस तोङी लांबत आहेत.आमच्यावर जानून बुजून अन्याय होत आहे.कार्यकारी संचालक यादव साहेब यांनी कारखाना गाळपा संदर्भात माहिती दिली.कारखान्याने आज पर्यंत 4,73,635 गाळप केले आहे.त्यापैकी 1,30,000 गेटकेन आहे. रिकव्हरी 10:66 आहे.आपल्या कारखान्याचा महाराष्ट्रातील चालू 165 कारखान्यात 9 वा नंबर आहे.तसेच पुणे जिल्ह्यात 1 नंबर आहे.दरवर्षी ङिसेंबर अखेर जे गाळप होते त्यापेक्षा आपले गाळप जास्त झाले आहे.परंतु 15/6 लागण तारीख आसलेले क्षेत्र जास्त प्रमाणात आहे.व कारखाना चालू करण्यास 15 दिवस उशिरा परवानगी मिळाली.1 जानेवारी पासून 15/6 लागण तारीख रोप लागण व खोङवा 265 ऊसतोङी चालू करण्यात येणार आहेत. गेटकेन पूर्ण बंद करण्यात येणार आहे. संपूर्ण ऊसतोङ यंत्रणा कार्यक्षेत्रात आणणार आहोत.आपला कारखाना एप्रिल पर्यंत चालू राहील. याप्रसंगी वैभव गायकवाड मा.सरपंच करंजेपूल, ऋतुराज काकङे, महेश शेंङकर, शिवाजीराव शेंङकर, राजेंद्र गायकवाङ, संभाजीराव गायकवाड सर, प्रकाश हूंबरे, किशोर हूंबरे, प्रदिप शेंङकर, निखिल शेंङकर , सचिनदादा शेंङकर, वसंतराव होळकर,शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड आदी सभासद उपस्थित होते.*