Skip to main content

  • Home
  • क्राईम
  • कॅन्सर झाल्याच्या गैरसमजुतीतून मुलाचा खून
Image

कॅन्सर झाल्याच्या गैरसमजुतीतून मुलाचा खून

प्रतिनिधी

कॅन्सर झाल्याची भीती मनात बसल्याने वडिलांनी दहा वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्याची घटना पोलीस तपासात उघडकीस आली आहे. वाठार पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त तपासात खुनाचे धागेदोरे उलगडले. या प्रकरणी विजय खताळ यांना अटक करण्यात आली असून त्यांना दि २९ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

हिवरे (ता कोरेगाव) येथे कुंभारकी नावाच्या शिवारात विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ या अल्पवयीन मुलाचा अज्ञात इसमाने गळा आवळून खून केला होता. याबाबत वाठार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके, यांच्या पथकाने वाठार पोलीस स्टेशनबरोबर समांतर तपास सुरू केला.

पथकाने मृत मुलाच्या खुनासंदर्भात तपशिलामध्ये माहिती घेतली. तसेच जवळपासच्या साक्षीदारांकडे कसून चौकशी करण्यात आली. सदरचा गुन्हा हा त्याच्या वडिलांनी केल्या असल्याबाबतचा संशय निर्माण झाला होता. मुलाच्या वडिलांनी दिलेली माहिती आणि साक्षीदारांनी दिलेली माहिती यामध्ये तफावत आढळून येत होती त्यानुसार हा खून विजय खताळ यांनीच केल्याचा संशय बळकट झाला होता. खताळ यांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनीच हा खून केल्याची धक्कादायक कबुली दिली.

खताळ यांना मानसिक दृष्ट्या आपल्याला कॅन्सर झालेला आहे, अशी भीती सातावत होती. तोच त्रास आपल्या मुलाला असल्यास व आपल्या पश्चात त्याचे पुढे कसे होईल या काळजीतूनच त्यांनी कुंभारकी शिवारामध्ये त्याचा गळा आवळून खून केला. वाठार पोलिसांनी खताळ याला अटक केली आहे.

Releated Posts

लोणीकंद गोळीबार व सोने चोरी प्रकरणातील फरार आरोपी मध्यप्रदेशमधून २४ तासांच्या आत जेरबंद

प्रतिनिधी लोणीकंद परिसरातील वाडेबोल्हाई येथे एका व्यावसायिकावर गोळीबार करून २२ तोळे सोने जबरीने चोरून नेणाऱ्या कुख्यात आरोपींना पुणे…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला तात्काळ अटक

 प्रतिनिधी :   वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच जीवे मारण्याची धमकी देत…

ByBymnewsmarathi Aug 5, 2026

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा

अक्षय थोरात: महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा

अक्षय थोरात: महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026