पुण्यात पुन्हा कोयता गँग सक्रिय; येरवड्यात तीस ते पस्तीस वाहनांची तोडफोड

क्राईम

प्रतिनिधी

येरवड्यात मध्यरात्री टोळक्याने दहशत माजवली. टोळक्याने ३० ते ३५ वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. येरवड्यातील लक्ष्मी नगर भागात मध्यरात्री टोळके आले. त्यांच्याकडे कोयते होते.

टोळक्याने लक्ष्मी नगर भागातील वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. विरोध करणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करून त्यांच्यावर कोणते उभारले. या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले. टोळक्याने ३० ते ३५ वाहनांची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी धाव घेतली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात गेल्या काही महिन्यांपासून दहशत माजवण्याचे प्रकार सुरू आहेत. वर्चस्वाच्या वादातून गुंड प्रवृत्तीचे तरुण नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करत असल्याचे दिसून आले आहे.