भीमा-कोरेगाव शौर्यदिन कार्यक्रम अनुषंगाने पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल.

Uncategorized

प्रतिनिधी –

दि. ०१ जानेवारी २०२४ जयस्तंभ कार्यक्रम अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे यांना मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ व ११७ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन त्यांनी मौजे पेरणेफाटा ता. हवेली जि. पुणे जि. पुणे येथे दि. १/१/ २०२४ रोजीच्या महामार्ग क्रमांक ६० वरील वाहतूक दि. ३०/१२/२०२३ रोजी सायंकाळी ५ वा.पासून ते दि.१/१/२०२४ रोजी रात्री १२ वा. पर्यत बंद करुन खालील प्रमाणे पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश देण्यात आलेला आहे.
* पर्यायी मार्ग *
१. शिक्रापुर ते चाकण व चाकण ते शिक्रापुर अशी जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील.

२. अहमदनगर बाजूकडून पुणे व मुंबई बाजूकडे येणारी जड-अवजड व इतर वाहने ही शिरुर-न्हावरा फाटा, न्हावरा- पारगाव-केडगाव चौफुला-यवत-सोलापूर रोड हडपसर या मार्गे पुणेकडे येतील.

३ . पुणे बाजूकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड-अवजड व इतर वाहने ही पुणे-खराडी-हडपसर-सोलापूर हायवे रोडने केडगाव चौफुला-पारगाव-न्हावरा शिरुर मार्गे अहमदनगर रोड अशी जातील.

४. मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड-अवजड व माल वाहतुक (ट्रक/टेम्पो इ.) ही वाहने वडगाव मावळ- तळेगाव-चाकण-खेड-नारायणगाव-आळेफाटा मार्गे अहमदनगर अशी जातील.

५. मुंबई व ठाणेकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी हलकी वाहने उदा. कार, जीप इत्यादी ही वडगाव मावळ-
तळेगाव-चाकण-खेड-पावळ-शिरुर मार्गे अहमदनगर अशी जातील.

वरील प्रमाणे पेरणे-कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमासाठी येणा-या अनुयायांच्या वाहनांसाठी शिथील राहतील .