वाहतुकीचे परमिटचे व पार्किंगचे नियम न पाळणाऱ्या रिक्षावर कारवाई

क्राईम

प्रतिनिधी

बारामती शहरामध्ये दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढलेली आहे रस्ते मोठे होऊन सुद्धा पार्किंग ची समस्या वाढत आहे. त्यामध्येच प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा ह्या रस्त्यावर बेशिस्तपणे पार्किंग करत असतात तसेच रिक्षा थांब्यावर व्यवस्थित लाईन मध्ये न थांबता आपापसामध्ये भांडण करून डबल लाईन करून थांबलेले असतात तसेच काही ठिकाणी बेकायदा पार्किंग करून वाहनांना अडथळे निर्माण करत असतात. कोणताही रिक्षाचालक हा त्याला नेमून दिलेला गणवेश बॅच व बिल्ला लावत नाही. आता काही शहरांमध्ये रिक्षा त्यामध्ये सुद्धा युनिफॉर्म नसल्यामुळे तो गुन्हेगार आहे का रिक्षावाला आहे हे कळत नाही. व महिला अत्याचारासारख्या घटना होत आहेत.

त्यामुळे याला आळा बसावा म्हणून आज बारामती शहरांमध्ये रिक्षा चालकांवर कारवाई करून 14 रिक्षा पोलीस स्टेशनला आणून. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे याही पुढे या वाहतूक नियमांचे पार्किंगचे वहिनी फॉर्म न घालण्याचे उल्लंघन केल्यास कारवाई सतत चालू राहणार आहे.सदरची कारवाई माननीय अपर पोलीस अधीक्षक अनंत भोईटे उपविभागीय पोलीस अधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुनील महाडिक पोलीस निरीक्षक बारामती शहर यांच्या आदेशान्वये वाहतूक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब जाधव तसेच पोलीस कर्मचारी जाधव झगडे चव्हाण घोळवे कदम चालक कांबळे महिला पोलीस कर्मचारी काळे साबळे जामदार