मुख्य मजकुरावर जा
Monday, 7 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 30 December 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
December 30, 2023 1 मिनिट वाचन 8,514 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी- फिरोज भालदार

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर मध्ये दोन कोटी रुपये निधीचे विविध विकास कामांचा भूमिपूजन चा कार्यक्रम २९/१२/२०२३ रोजी वडगाव निंबाळकर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी नाना होळकर यांच्या हस्ते पार पडला .

यामध्ये शरद नगर अंतर्गत रस्ता , उर्वरित पेरूचा माळा रस्ता कॉंक्रिटीकरण , तात्या मामुनीचे तुकाय माता मंदिर रस्ता ,भिम नगर साळवे वस्ती वार्ड क्रमांक चार भुयारी गटार , निरा बारामती रोड ते मोहन पाटोळे घर रस्ता , वडगांव निंबाळकर रमा माता नगर बाजार तळ ते हायस्कूल झोपडपट्टी रस्ता , जगताप वस्ती मुढाळे ते शांताबाई काकडे घर व तुकाराम साळवे घर रस्ता , अल्पसंख्याक कब्रस्तान ऑल कंपाऊंड बांधकाम , इरिगेशन बंगला झोपडपट्टी अंगणवाडी, ढोलेवस्ती अंगणवाडी ,पांढरी अंगणवाडी या ठिकाणी मंजूर झालेली विकास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला .

यावेळी वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत सरपंच सुनील ढोले , उपसरपंच संगीताभाभी शहा , ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख