Image

काकडे महाविद्यालयात पालक मेळावा संपन्न

प्रतिनिधी

        सोमेश्वरनगर- येथील मु.सा. काकडे महाविद्यालयामध्ये इयत्ता अकरावी व इयत्ता बारावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे सर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नुकत्याच पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्त झालेल्या मयुरी महादेव सावंत होत्या. यावेळी संस्थेचे सचिव श्री. सतीशराव लकडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. रवींद्र जगताप, तसेच मोठ्या संख्येने पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

        यावेळी राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये राज्यात मुलींमध्ये बाराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मयुरी सावंत हिचा सत्कार करण्यात आला यावेळी आपल्या मनोगत मध्ये त्या म्हणाल्या की, अभ्यासामध्ये सातत्य व परिश्रम आणि घरच्यांचा पाठिंबा यामुळेच हे यश संपादन केले असे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येकाने आपले ध्येय एकदा ठरवले की ते पूर्ण करण्यासाठी मनोमन प्रयत्न केला पाहिजे, आणि जिद्द चिकाटी असेल व घरच्यांचा पाठिंबा असेल तर यश निश्चित मिळते. असे विचार मांडले.

        अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे सर यांनी पालक आणि महाविद्यालय यामध्ये संवाद होणे महत्त्वाचे असून म्हणूनच पालक मेळाव्याचे आयोजन केले आहे. यामध्ये जास्त संख्येने महिला पालक उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयामधील शिस्त, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, उपलब्ध सोयी सुविधा याविषयी विचार मांडले, तसेच विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती ही कौतुकास्पद असून, त्याचे श्रेय विद्यार्थी व शिक्षक यांचे आहे. त्यामुळे त्यांचे ही अभिनंदन केले.व विद्यार्थ्यांचा विविधाअंगी विकास व्हावा म्हणून महाविद्यालय सातत्याने प्रयत्न करीत आहे व यातून अनेक विद्यार्थी ही विविध क्षेत्रांमध्ये करिअर करीत आहे हे त्याचेच फलित आहे असे आवर्जून सांगितले.

       यावेळी अनेक पालकांनी आपले विचार व्यक्त केले त्यामध्ये श्री. कांचन निगडे यांनी महाविद्यालया च्या प्रगतीचे कौतुक करून, प्राचार्यांच्या मार्गदर्शनामुळे महाविद्यालयाचा विकास होत आहे असे यावेळी सांगितले, तसेच भविष्यात महाविद्यालयाकडून अनेक अपेक्षा आहेत व काही सूचना त्यांनी यावेळी केल्या.

       या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य रवींद्र जगताप यांनी केले, यामध्ये त्यांनी सर्व पालकांचे स्वागत करून, बोर्ड परीक्षा संदर्भात विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पालक शिक्षक संघाचे समन्वयक प्रा.दत्तराज जगताप यांनी केले.

Releated Posts

सोलापुरात संत गजानन महाराज आणि सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या पालखी भेटीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

प्रतिनिधी सोलापुरात संत गजानन महाराज आणि सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या पालखी भेटीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.…

ByBymnewsmarathi Jul 19, 2026

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026