पुरंदर.किरकोळ कारवाईनंतरही निरा मोरगाव रोडवरील त्या हॉटेल वरती अवैद्य दारू विक्री सुरूच. पोलिसांची कारवाई फक्त नावापुरतीच?

क्राईम

संपादक मधुकर बनसोडे.

 एम न्यूज मराठी ने प्रसिद्ध केलेल्या बातमीची दखल घेत काही दिवसापूर्वी निरा येथील पोलीस प्रशासनाने नीरा मोरगाव रोडवरील अवैद्य दारू विक्री करणाऱ्या हॉटेल चालकावरती तोडकीमोडकी कारवाई केली? मात्र त्या हॉटेल चालकाने पुन्हा नव्या जोमाने आपला अवैद्य दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केल्याचे चित्र दिसत आहे.

 एम न्यूज मराठीच्या हाती आलेल्या माहितीनुसार पोलीस प्रशासनाने कारवाई केलेल्या प्रेस नोट मध्ये दारू विक्री ही हॉटेलच्या बाहेर आडोशाला होत असल्याचे म्हटले आहे मात्र दारू विक्री ही हॉटेलमध्येच होत असल्याचे वास्तव चित्र आहे.

 पोलीस प्रशासनाच्या कारवाईमध्ये देशी दारूच्या काही बॉटल्स मिळाल्या असल्याची माहिती मिळत आहे.

 मात्र वास्तव मध्ये त्या हॉटेलमध्ये विदेशी दारूची विक्री ही मोठ्या प्रमाणात होत असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

 कारवाई करून देखील हॉटेल चालक अवैद्य धंदे करण्यापासून थांबत नसेल तर अशा हॉटेलला सील करण्याचा अधिकार आहे का? असेल तर त्याची अंमलबजावणी होणार का. पुरंदर चे लोकप्रिय आमदार या अवैद्य दारू विक्री विषयांमध्ये लक्ष घालावे अशी नागरिकांमधून मागणी होत आहे. पुरंदर तालुक्यातील एक्साईज डिपार्टमेंट हे फक्त नावापुरताच आहे की काय? अशी देखील चर्चा पुरंदर तालुक्यातील निरा गावांमधून होत आहे. नीरा मोरगाव रोडवर असे अनेक हॉटेल्स आहेत ज्या ठिकाणी अवैध दारू विक्री केली जाते.

 सर्व माहिती पोलीस प्रशासन एक्साइज डिपार्टमेंट यांना माहीत असून सुद्धा हे कारवाई करत नाहीत?अशी स्थानिक नागरिकांमधून चर्चा होत आहे.

माननीय अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग या अवैध पद्धतीने हॉटेलमध्ये दारू  विकणाऱ्यांवरती त्वरित कारवाई करून या हॉटेल वरती सील लावण्याचे काम आपण तरी करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे