अवैध वाहतूक करणाऱ्या जनावराची केली सुटका ब्रह्मपुरी पोलिसाची धाडसी कार्यवहि

क्राईम

ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा भुज ते एकारा रोड दरम्यान अवैधरित्या गोवंश जनावरे वाहतूक होत असल्याचे गोपनीय माहितीनुसार दिनांक २१/ ११ /२०२२ रोजी रात्री एक वाजता ते सहाच्या दरम्यान पोलिसांनी सापळा रचून अवैध जनावराची वाहतूक होत असलेले दोन आयशर ट्रक वाहन एम एच ४० सीडी ४९ १७ व एम एच ४० सीडी ४० १३ हे दोन वाहन ताब्यात घेऊन सर्व जनावराची सुटका करून गोरक्षण केंद्रात जमा केले व आरोपी विरोधात पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे आणून गुन्हा नोंदविला दोन्ही वाहनात चाळीस गोवांश जनावरे किंमत पाच लाख ट्रक किंमत २४ लाख असा एकूण २९ लाख रुपयाचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आला व सहा आरोपीविरुद्ध कलम ५ (अ ) व महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सहकलम ११( डी/ एफ प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम सहकलम ११९, महाराष्ट्र पोलीस अधिनियम सहकलम ८३ / १७७ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला . सदरची कार्यवाही श्री मल्लिकार्जुन इंगळे सा उपविभागीय पोलीस अधिकारी मुल अतिरिक्त कार्यभार ब्रह्मपुरी पोलीस निरीक्षक रोशन यादव पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे , पोलीस उपनिरीक्षक राजेश उंदीरवाडे, ना.पो.शी तेजराम जनबंधू , पो. हवालदार हरिदास सुरपाम, पोलीस शिपाई राजेश्वर धंदरे यांनी केली असून गुन्ह्याचा सदर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे हे करीत आहेत .