मु.सा काकडे महाविद्यालयात राज्य क्रीडादिन उत्साहात साजरा.*

Uncategorized

 मु.सा काकडे महाविद्यालयात राज्य सरकार व महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन यांच्या विद्यमाने ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे ऑलंपिक वीर खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त १५ जानेवारी रोजी राज्यक्रीडा दिनानिमित्त मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक युवराज शिंदे, महाविद्यालय व्यवस्थापन समिती सदस्य सुजाता भोईटे मॅडम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे सर,संस्थेचे सचिव सतीश लकडे, उपप्राचार्य डॉ.जगन्नाथ साळवे,डॉ. प्रवीण देशमुख, डॉ. जया कदम मॅडम, आयक्यूएसी समन्वयक डॉ. संजू जाधव,उपप्राचार्य प्रा. रवींद्र जगताप,पर्यवेक्षिका प्रा. जयश्री सणस मॅडम उपस्थित होते.*
*युवराज शिंदे यांनी मार्गदर्शन करत असताना आपल्या मनोगतात ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या ऑलम्पिक मधील कामगिरीचा जीवनपट उघडून दाखवला व राज्य सरकारने खशाबा जाधव यांचा केलेला गौरव निश्चितच खेळाडूंना प्रेरणा देणारा ठरेल असे मत व्यक्त केले.*
*महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालय खेळाडूंच्या पाठीशी कायम खंबीरपणाने उभे असून महाविद्यालयाकडून खेळाडूंना पुरवल्या गेलेल्या सुविधांविषयी आढावा घेतला व भविष्यातही सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले.* *कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सतीश भैय्या काकडे-देशमुख महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत भैय्या काकडे-देशमुख संस्थेचे सचिव सतीश लकडे सर यांनी शुभेच्छा दिल्या.**
*कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा . दत्तराज जगताप यांनी केले.कार्यक्रमाचे आभार डॉ. बाळासाहेब मरगजे यांनी मांनले.**