Skip to main content

  • Home
  • माझा जिल्हा
  • बदलापूरच्या केमिकल कंपनीत भीषण स्फोट, आग लागल्याने एका कामगाराचा मृत्यू, चार जण जखमी
Image

बदलापूरच्या केमिकल कंपनीत भीषण स्फोट, आग लागल्याने एका कामगाराचा मृत्यू, चार जण जखमी

प्रतिनिधी

बदलापूरमधल्या खरवई या भागात असलेल्या व्ही. के. केमिलकल कंपनीत आज पहाटे पाचच्या दरम्यान स्फोट झाले. या स्फोटामुळे कंपनी पेटली. या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला तर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. खरवई गावात ही कंपनी आहे. या ठिकाणी रासायनिक केमिकलवर प्रक्रिया केली जात होती. पहाटे पाचच्या दरम्यान पाच स्फोट झाले. हे स्फोट इतके भयंकर होते की पाच किलोमीटर अंतरावर त्याचे हादरे बसले. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु केले. जे कामगार जखमी अवस्थेत होते त्यांना बाहेर काढून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

कंपनीतल्या स्फोटाचे हादरे ४ ते ५ किलोमीटर लांब जाणवले ,या स्फोटात पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत ,या कंपनीच्या बाहेर दोन टेम्पो उभे होते .या टेम्पो मधील केमिकल मध्ये प्रथम आग लागली त्यानंतर ही आग कंपनीमध्ये पसरली असे कंपनीतील कामगारांचे म्हणणं आहे, बदलापूर अंबरनाथ , अंबरनाथ आनंद नगर एम आय डी सी मधील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आता ही आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आलं आहे.

Releated Posts

निरा–बारामती मार्गावरील एसटी चालकांच्या गैरवर्तनाच्या तक्रारी; कारवाईची मागणी

प्रतिनिधी मानवाधिकार संरक्षण समितीचे बारामती आगार व्यवस्थापकांना निवेदन निरा–बारामती मार्गावर सेवा देणाऱ्या काही एसटी बसचालकांकडून प्रवाशांशी उद्धट वर्तन,…

ByBymnewsmarathi Aug 11, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी- अक्षय थोरात उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

 प्रतिनिधी :   उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026