प्रतिनिधी – फिरोज भालदार
महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासन पुरस्कृत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा,पुणे यांच्यावतीने *अटल भूजल योजनेअंतर्गत शालेय भूजल सप्ताह* जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नं.१ (मुलांची) येथे आयोजित करण्यात आला होता. शालेय भूजल सप्ताह निमित्त शाळेमध्ये पाणी बचतीबाबत जागृती निर्माण होण्यासाठी निबंध,चित्रकला आणि घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.त्यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी *शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल जाधव, सामाजिक कार्यकर्ते सुनील खोमणे,ग्रामपंचायत सदस्य पिंटू किर्वे,शिवसेना बारामती विधानसभा क्षेत्रीय प्रमुख निलेश मदने,शा.व्य.समितीचे सदस्य अनिल खोमणे,शा.व्य.समितीच्या उपाध्यक्षा रूपाली चव्हाण,मुख्याध्यापिका अरुणा आगम,उपशिक्षिका मालन बोडरे,सुरेखा मगदूम,उपशिक्षक अनिल गवळी व पालक उपस्थित होते.*
अटल भूजल योजनेच्या भूजल सप्ताहनिमित्ताने शाळेमध्ये दि.१४ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर कालावधीत विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये *जल प्रतिज्ञा,गाथा जलाची फिल्म दाखवली,पाणी बचतीसाठी जलदिंडी फेरीचे आयोजन,तसेच निबंध,चित्रकला /घोषवाक्य यासारख्या स्पर्धा* घेण्यात आल्या होत्या.सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने त्यामध्ये भाग घेतला.शाळेने सदर कार्यक्रम उत्कृष्ट घेतल्याबद्दल शाळेला ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक अनिल गवळी यांनी,तर आभार उपशिक्षिका मालन बोडरे यांनी मानले.*स्पर्धा व विजेते पुढील प्रमाणे*
*चित्रकला स्पर्धा*
*प्रथम क्रमांक-आर्यन सागर गवळी*
*द्वितीय क्रमांक-सिद्धीराज सागर शिंदे*
*तृतीय क्रमांक-यश मंगेश गायकवाड*
*निबंध स्पर्धा*
*प्रथम क्रमांक-आकाश शेखर आगम*
*द्वितीय क्रमांक-सार्थक राहुल जाधव*
*तृतीय क्रमांक-यशराज सुशीलकुमार अडागळे*