• Home
  • क्राईम
  • पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव; खून करून तरुण पसार
Image

पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव; खून करून तरुण पसार

प्रतिनिधी

पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव करून एकाने तिचा गळा आवळून खून केल्याची घटना गोखलेनगर परिसरात घडली. पत्नीचा खून करून पसार झालेल्या तरुणाविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रेश्मा चंदर पंतेकर (वय ३०, रा. जनता वसाहत, जनवाडी, गोखलेनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी चंदर अशोक पंतेकर (वय ३३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत राहुल राजू मंजाळकर (वय २४, रा. सुतारवाडी, पाषाण) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रेश्मा आणि चंदर यांचा बारा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना बारा वर्षांचा मुलगा आहे. काही महिन्यांपासून चंदर पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन छळ करत होता. तिच्याकडे पैशांची मागणी करत होता. त्यामुळे रेश्मा माहेरी गेल्या होत्या. १९ जानेवारी रोजी चंदरने रेश्माशी संपर्क साधला. माझी चूक झाली आहे. तू घरी ये, असे त्याने सांगितले. त्यानंतर रेश्मा घरी आल्या.  बुधवारी (२४ जानेवारी) राहुलने चंदरशी संपर्क साधला. तेव्हा रेश्मा कामावर गेल्याचे त्याने सांगितले. संशय आल्याने रेश्माचे वडील तिच्या घरी आले. तेव्हा रेश्मा बेशुद्धावस्थेत पडली होती. पंख्याला ओढणी बांधण्यात आल्याचे आढळून आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालात त्यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी चंदर पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.

Releated Posts

कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; महामार्गावर बस लुटणारी टोळी गजाआड, सव्वा कोटींची चांदी जप्त

प्रतिनिधी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर धाडसी दरोडा टाकून कुरियर बसमधील सव्वा कोटींची चांदी लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा कोल्हापूर पोलिसांनी…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

बारामतीत गुन्हेगारांची गय नाही! सराईत गुंडांवर तडीपारीची कुऱ्हाड; पोलिसांचा कडक पवित्रा

प्रतिनिधी ​दहशत माजवणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले; नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम बारामती शहर आणि तालुक्यात वारंवार गंभीर गुन्हे…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025

बारामतीत पोलिसांचा थरार; धारदार शस्त्रांसह सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

प्रतिनिधी ​दहशत पसरवण्याचा प्रयत्न फसला; पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई बारामती शहर आणि परिसरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने घातक शस्त्रे…

ByBymnewsmarathi Dec 22, 2025

बारामतीत पोलिसांचा ‘महामोहीम’ तडाखा; गुणवडी, जळोचीसह नीरा वागजमधील अवैध धंदे उद्ध्वस्त

प्रतिनिधी ​१५ जणांवर गुन्हे दाखल; ५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, गावठी दारूचे रसायन केले नष्ट बारामती शहर आणि…

ByBymnewsmarathi Dec 22, 2025