प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२३-२४ या गाळप हंगाम सुरू होवुन कारखान्याने ९० दिवसांमध्ये जवळपास ७ लाख ६९ हजार मे.टन गाळप पूर्ण केलेले आहे. त्यापैकी कारखान्याने १ लाख ७५ मे.टन एवढा गेटकेन उस गाळपास आणला आहे. व सभासदांचा फक्त ५ लाख ९४ हजार मे.टन उसाचे गाळप केलेले आहे. कारखान्याने गेटकेन उस तात्काळ बंद करून कारखान्याच्या परिपत्रकानुसार सभासदांची उस तोड व्हावी. यासाठी कृती समितीने समक्ष भेटुन निवेदन देवुन जाब विचारला होता. तरीही कारखान्याने गेटकेन उस अद्यापपर्यंत बंद केलेला नाही.
आज सभासदांचा १५/६ ते ३०/६ पर्यंतचा आडसाली ८६०३२ व २६५ उस ४ हजार एकर
म्हणजेच अंदाजे १ लाख ८५ मे.टन एवढा शिल्लक आहे. तसेच कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये अद्याप
ही आडसाली, सुरू व खोडवा असा एकुण ७ लाख ३१ हजार मे.टन उस शिल्लक आहे. त्याचप्रमाणे
ज्या शेतकऱ्यांनी रोपांच्या लागणी केल्या आहेत. की ज्यास कारखाना प्रधान्याने तोड देणार होता तो
सभासदांचा उस आज ही शेतात उभा आहे. तसेच ज्या सभासदांनी गेल्या वर्षी खोडवे राखले त्या
उसालाही जवळपास १३ ते १४ महीने झाले आहेत तो उस ही शेतात उभा आहे. सभासदांच्या उसाचे
वेळेत गाळप न झाल्याने सभासदांचे १० ते १५ मे. टनाचे नुकसान झालेले आहे. सभासदांचा
रिकव्हरीचा उस सोडुन चेअरमन मात्र गेटकेनचा कोवळा उस गाळप करण्यात दंग आहेत व त्यामुळे
कारखान्याचे सुध्दा नुकसान होत आहे. चेअरमन व संचालक मंडळाने जानेवारी पासुन कारखाना बंद
होईपर्यंत तुटणाऱ्या उसास ७५ ते १५० रूपये पर्यंत अनुदानाचे गाजर दाखवलेले आहे. तसेच जे उस
तोडीचे परिपत्रक काढले आहे त्यातील सर्व गोष्टींना चेअरमन यांनी तिलांजली दिली आहे. चेअरमन
यांना कदाचित चालु गळीत हंगामात सभासदांचा उस कमी असतानाही जास्तीत जास्त गेटकेन उस
आणुन पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त कशींग करून मा. अजितदादा यांचे जवळ स्वतःची कॉलर
टाईट करावयाची असावी व कारखाना चांगला चालविला म्हणुन शाबासकी मिळवुन उर्वरीत अडीच वर्ष
देखील स्वतःलाच चेअरमन पद मिळावे असे कारस्थान चेअरमन यांनी चालविल्याचे स्पष्ट दिसुन येत
आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखाना हा नेमका सभासदांचा आहे की गेटकेनधारकांचा याचा खुलासा प्रथम
चेअरमन व MD यांनी करावा. तसेच काही जेष्ठ संचालक चेअरमन पद मिळावे म्हणुन बाशींग बांधुन
तयार आहेत परंतु उसतोडी बाबत मिटींगमध्ये काही बोलण्यास तयार नाहीत
गेली १० ते १५ दिवसांपुर्वी सोमेश्वरच्या MD यांना VSI चा उत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्कार मिळाल्याचे वाचनात आले आहे. MD तुम्ही सभासदांच्या व कृती समितीने दिलेल्या अर्जावर कधी लेखी उत्तरे दिली आहेत का? तसेच तुम्ही सभासदांच्या उस तोडी बाबत जे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार कधी अंमलबजावणी केली का? गेल्या १० ते १५ वर्षात तुम्ही किती कारखाने बदलले व का बदलावे लागले याचीही माहिती पेपरच्या माध्यमातुन सभासदांना व परिसराला कळु द्या, सभासदांचा रिकव्हरीचा उस बाहेरील कारखान्यांना जात आहे व तुम्ही गेटकेनचा कोवळा उस कारखान्यात गाळपास आणत आहात यावरूनच तुमची कार्यक्षमता दिसत आहे. वरील सर्व बाबी लक्षात घेता तुम्ही वशीला लावुन तर पुरस्कार मिळवला नाही ना? कारखाना परिपत्रकानुसार उस वेळेत न गेल्याने प्रत्येक एकरा मागे सभासदांचे १० ते १२ मे.टन उसाचे म्हणजेच ३५ ते ४० हजार रूपयांचे नुकसान होत आहे. त्याची जबाबदारी चेअरमन व MD यांनी घेवुन स्वतःच्या खिशातुन सभासदांना याची भरपाईची द्यावी. कारण कारखान्याने जे अनुदान जाहीर केले आहे ते पुर्णतः सभासदांची दिशाभुल करणारे आहे. तसेच ज्या सभासदांची उसतोड सुरू आहे त्या त्या ठिकाणी उस तोड मजुरांकडुन बहुतांश सगळीकडेच पैशांची मागणी होत आहे. चेअरमन, संचालक मंडळ व MD यांनी जो गेटकेनचा कोवळा उस गाळपास आणत आहेत त्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील परिपक्व असा साधारण एक हजार मे.टन उस दररोज बाहेरील कारखान्यास गाळपास जात आहे. त्यामुळे सभासदांचे पर्यायाने कारखान्याचे नुकसान होत आहे. चेअरमन व MD यांनी वेळेत गेटकेन उस बंद केला असता तर आता सभासदांचा उस बाहेर गेला असता का? याचे आत्मपरिक्षण दोघांनी करावे.
तरी कृती समितीच्या वतीने सर्व सभासदांना आवाहन करण्यात येत आहे की सोमेश्वर कारखान्याच्या उस तोडीच्या बेजबाबदार धोरणाचा व इतर सर्व बाबींचा जाब विचारण्यासाठी शनिवार दि.३/२/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता सोमेश्वर कारखान्यावर मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. घरी बसुन किंवा मला फोन करून तुम्हाला न्याय मिळणार नाही.
ज्या सभासदांचे परिपत्रकानुसार उस गेलेले नाहीत, ज्या सभासदांकडुन उस तोडीसाठी पैसे घेतले आहेत, ज्या सभासदांचे उस जाळुन आणले आहेत, ज्यांचे अनाधिकृतपणे पैसे उसबीलातुन कपात केलेले आहेत. अशा सर्व सभासदांनी चेअरमन संचालक मंडळ व MD यांना जाब विचारण्याकरीता शनिवार दि. ३/२/२०२४ रोजी सकाळी ११ वा कारखान्याच्या डिस्टलरी चौकात उपस्थित राहण्याचे अवाहन शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे.