सुपे पोलीस स्टेशन मध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल

क्राईम

प्रतिनिधी

बारामती -: सुपा पोलीस स्टेशन या ठिकाणी 26 जानेवारी 2024 रोजी अखेर भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 143, कलम 147,कलम 159, कलम 427, कलम 323, कलम 295 -A,कलम 504, कलम 506,तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियम 1989 3(1)(g), 3(2)(va),3(1)(r),3(1)(s), नुसार सुपा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झाला असून संबंधित आरोपी नामे शैलेश प्रताप गवळी, गोरख सुधाकर गवळी, रोहिणी मल्हारी गवळी, भास्कर शंकर भगत, सुरेश संपत गवळी हे सर्व राहणार उंडवडी सुपे या ठिकाणी असून केवळ एका अनुसूचित जातीच्या बाबांनी शौचालय बांधलं म्हणून केलेला अतिरेक अत्याचार नेमकी हाकिकत काय खालील प्रमाणे

मी तानाजी रामचंद्र दुर्गे राहणार उंडवडी सुपे तालुका बारामती जिल्हा पुणे मोबाईल क्रमांक या ठिकाणचा रहिवाशी असून मी सन 2022 पूर्वी माझे कुटुंबीयांसमवेत मुंबई या ठिकाणी रहात होतो

माझे वय झाल्याने व माझ्या पत्नीचे निधन झाले असल्याकारणाने मी सन 2022 मध्ये गावाकडे राहण्याचा विचार केला त्या अनुषंगाने मी मौजे उंडवडी सुपे तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणावरील सौ. लक्ष्मी अण्णा धोत्रे व संध्या गणेश धोत्रे यांचे घर व घराशेजारील मोकळी बखळ जागा विकत घेतली व त्या ठिकाणी राहावयास आलो.

मी या ठिकाणी राहत असताना माझ्या घरामध्ये शौचालय नव्हते. परंतु महाराष्ट्र शासनाने प्रत्येक घरी शौचालय असावे असा नियम काढल्याने व मी माझे वय जास्त असल्याने मला रात्री अपरात्री तसेच हवामान योग्य नसलेले वेळी घरापासून इतरत् शौचा व इतर गोष्टी कारण्यास जाण्यास अडचण होत होती.

त्यामुळे मी माझ्या घराशेजारील जागेमध्ये शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. मी शौचालयाचे काम सुरू केले त्यावेळी माझ्या घराशेजारील व गावातील इतर व्यक्ती या न त्या कारणाने माझे शौचालयाच्या बांधकामास वेळोवेळी विनाकारण विरोध करत होते.

त्यानंतर काही दिवसांपूर्वी मी तयार शौचालय माझे घराशेजारील जागेमध्ये आणून बसवले. त्यानंतर दिनांक 13/01/2024 रोजी उंडवडी सुपे गावातील इसम नामे श्री. शैलेंद्र प्रतापसिंह गवळी ( भोसले) श्री. गोरख सुधाकर गवळी, श्री. सुरेश संपत गवळी, श्री. भास्कर शंकर भगत, सौ. रोहिणी मल्हारी गवळी व इतर दोन ते तीन अनोळखी इसम सकाळी अंदाजे साडेअकरा वाजता माझ्या घराला लागूनच असलेल्या रस्त्यावर येऊन माझ्या घराकडे पाहून जोर जोराने शिवीगाळ, आरडाओरडा व खाना खुणा करू लागले. या सर्व लोकांना मी ओळखतो व ते देखील मला ओळखतात, त्याचप्रमाणे मी जातीने चांभार आहे हे देखील त्यांना माहीत आहे.

हे सर्व इसम मला मोठ्या मोठ्याने काहीतरी ओरडत असल्याचा आवाज ऐकून मी घराबाहेर आलो. त्यावेळी यामधील इसम श्री शैलेंद्र प्रतापसिंग गवळी (भोसले) हा माझ्याजवळ आला व मला मोठ्याने ओरडून म्हणाला अरे चांभारा नालायका या ठिकाणी शौचालय बांधायचे नाही! असे तुला सांगितले होते ना! तरी तू का बांधले? व माझ्यावर धावून आला व मला लाथा बुक्क्यांनी मारहाण करू लागला. यादरम्यान त्याला माझ्या गळ्यामध्ये दोरीने बांधलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच पेंडेंट दिसले. त्यावेळी त्यांनी पेंडेंट गळ्यातून दोरी तोडून काढल व खाली टाकून तुडवल. त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री. गोरख सुधाकर गवळी हा देखील मला मोठ्या मोठ्याने शिव्या देत होता व स्वतःची चप्पल हातात घेऊन या चपलेप्रमाणे तुझी लायकी आहे! चांभारा तू खालच्या जातीचा आहेस! तुझा कचरा आम्ही गावात होऊ देणार नाही! अशाप्रकारे खाना खुणा करत होता व ओरडून मला शिवीगाळ करत होता. त्याचप्रमाणे माझे कपडे ओढत होता व माझा शर्ट फाडून काढला. त्यांचे बरोबर श्री. भास्कर शंकर भगत, सौ रोहिणी मल्हारी गवळी व श्री. सुरेश संपत गवळी तसेच इतर तीन ते चार अनोळखी इसम होते हे सर्वजण खाना खुणा करून याचं घर जेसीपी ने काढून टाका व याला देखील त्याच्यामध्ये गाडून टाका. हा चांभार आहे याची लायकी हीच आहे असल्या खालच्या जातीची घाण आमच्या गावात आम्ही खपवून घेणार नाही असे ओरडून व खाना खुणा करून सांगत होते.

या सर्व झटापटीमध्ये माझ्या खिशातील मतदान कार्ड व रक्कम रुपये पाच हजार दोनशे (Rs.5200/-) देखील गहाळ झाले. या गोष्टी नक्की कोणी घेतल्या मला नक्की सांगता येणार नाही. परंतु या झटापटीमध्येच कोणीतरी माझी कपडे ओढत असताना या वस्तू गहाळ झाल्या आहेत.

यानंतर यांचे बरोबर असणारे तीन अनोळखी इसम पैकी दोघांनी पांढऱ्या कलरचा टी-शर्ट घातला होता व एकाने डोक्यामध्ये टोपी घातली होती है इसम देखील जोरजोराने ओरडून मला जातिवाचक शिवीगाळ करून माझ्या दिशेने स्वतःच्या चपला काढून फेकत होते.

त्यानंतर यामधील इसम नामे श्री. शैलेंद्र प्रताप भोसले गवळी (भोसले), श्री. गोरख सुधाकर गवळी, श्री. सुरेश संपत गवळी व श्री. भास्कर शंकर भगत व इतर तीन अनोळखी इसम यांनी मला खाना खुना करून व ओरडून असे धमकावले की तू जर परत या ठिकाणी आलास तर तुला घरासह जिवंत गाडून टाकू. या सर्व लोकांनी यादरम्यान माझ्या घरासमोरील शौचालय पूर्णपणे पाडून टाकले व जेसीबी मशीन बोलावून माझे घर पूर्ण पाडून टाकण्याची तयारी करत होते. परंतु गावातील इतर लोक जमा झाल्याने हे सर्व लोक मला पोलिसात तक्रार केल्यास जिथे असशील तिथे येऊन तुझे हात पाय तोडून टाकू व तुला व पूर्ण कुटुंबाला संपवून टाकू धमक्या मोठमोठ्याने ओरडून व खाना खुणा करून देऊन निघून गेले,

हा सर्व प्रकार ज्यावेळी घडला त्यावेळी इसम नामे श्री. नितीन सुरेश पवार व इसम नामे श्री. रमीज मगदूम जातगार हे व गावातील इतर बरेचसे अनोळखी लोक समक्ष पाहण्यास होते त्यानंतर त्या दिवशी मी सुपा पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी गेलो. परंतु या सर्व इसमांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याने मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घाबरून तक्रार न देता माघारी आलो. माघारी आलेल्या दिवसापासून मी जीवाच्या भीतीने घरातच बसून होतो. आज रोजी यातील इसम श्री. शैलेंद्र प्रतापसिंह गवळी व श्री गोरख सुधाकर गवळी मी घरी असताना माझ्या घरा शेजारून गेले व माझ्याकडे बघून तुला लवकरच घरासह गाडून टाकू अशा खानाखुणा करत होते. त्यामुळे मी वरील नमूद 04 इसम व 03 अनोळखी इसम यांचे विरुद्ध सोपा पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन तक्रार देत आहे

त्याचप्रमाणे मी अपंग देखील आहे या वयामध्ये माझी इतर कोणतीही सोय नाही माझे कुटुंबामध्ये इतर कोणीही व्यक्ती माझे जवळ राहण्यास नाही तरी वरील इसमांपासून मला संरक्षण द्यावे करताना गुन्हा दाखल होऊन आरोपी अद्याप अटक आहेत की नाही हे देखील माहिती समोर आलेले नाही यातील आरोपी अटक होतील का? या कडे सर्व बारामती तालुक्यामधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.