• Home
  • इतर
  • राग मनात धरुन केला प्राणघातक हल्ला ! माळेगाव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल.
Image

राग मनात धरुन केला प्राणघातक हल्ला ! माळेगाव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल.

प्रतिनिधी- फिरोज भालदार

दिनांक 22- 11- 2022 रोजी आरोपी सलमान उर्फ सलीम राशिद शेख रा.शिरवली ता.बारामती जि.पुणे हा व्यक्ती आत्मशांती चिकण सेंटर चांदणी चौक सांगवी येथे जाऊन फिर्यादी सिकंदर आयुब शेख रा. वाचवस्ती रोड चांदणी चौक सांगवी ता. बारामती जि. पुणे यांच्या सखा भाऊ निसार शेख यांची पत्नी यांना चिकन मागितले असता त्यांनी सलमान उर्फ सलीम यास आज चिकन सेंटर बंद झाले आहे. चिकन संपले आहे असे सांगितले. त्यामुळे सलीम यानी निसार यांच्या पत्नीला शिविगाळी केली व तसेच दरवाजावर लाथा मारून घरावर दगडफेक करून तिथून निघून गेला. तसेच सलमान उर्फ सलीम याने या गोष्टीचा राग मनात धरून दिनांक 22-11-2022 रोजी रात्री 9.50 सुमारास फिर्यादी सिकंदर हा त्याच्या मित्राला भेटण्यासाठी त्याच्या शेतजमीन गोठ्यावर जात असताना अचानकपणे सलमान उर्फ सलीम याने त्याच्यासोबत दोन अनोळखी व्यक्तींना मोटरसायकलवर सोबत घेऊन आला आणि फिर्यादी सिकंदर यांच्या पाठीमागून येऊन काही कारण नसताना लोखंडासारख्या टोकदार कठिण धातूच्या अज्ञात हत्याराने सिकंदर यांच्या उजव्या डोळ्याच्या कपाळावर तसेच डाव्या डोळ्याच्या वरील बाजूस डोक्यात फ्रॅक्चर करून गंभीर दुखापत केली, तसेच सिकंदर याचा विवो कंपनीचा व्ही 19 मॉडेलचा मोबाईल हा सलमान याचेसोबत आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींपैकी कोणीतरी मोबाईल घेऊन गेला. यावरून सिकंदर आयुब शेख यांनी माळेगाव पोलीस स्टेशनमध्ये सलमान उर्फ सलीम राशिद शेख व दोन अज्ञात व्यक्तीविरुद्ध आपली फिर्याद नोंदवली आहे. फिर्याद दाखल अमलदार पोणा सानप , तसेच पुढील तपास पो हवा मोहिते हे करीत आहेत.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025