• Home
  • क्राईम
  • बारामती ! होळ मधील ढगाई देवी मंदिरामध्ये चोरी ; अज्ञात चोरट्याविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल .
Image

बारामती ! होळ मधील ढगाई देवी मंदिरामध्ये चोरी ; अज्ञात चोरट्याविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल .

प्रतिनिधी – फिरोज भालदार

 बारामती तालुक्यातील होळ येथील प्रसिद्ध श्री.ढगाई देवी मंदिरामध्ये दि. २८ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ७ ते दि. २९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान ढगाई देवी मंदिरामध्ये अज्ञात चोरट्याने खिडकीचे ग्रील कटावणी सारख्या वस्तूच्या सहाय्याने उचकटुन खिडकीव्दारे मंदीरामध्ये प्रवेश करून चोरी केल्याचे २९ जानेवारी सकाळी होळ येथील ढगाई देवी मंदिराचे पुजारी केशव क्षीरसागर यांनी मंदिर उघडल्यावर ही चोरीची घटना उघडकीस आली .

 मंदिरामध्ये प्रवेश करून मंदीरामधील दान पेटीचे कुलुप तोडुन महीन्याभरात भाविकांनी दान केलेली त्यातील अंदाजे एक हजार रुपए रोख रक्कम फिर्यादी मंदिराचे पुजारी केशव क्षीरसागर यांच्या वीणासंमती अज्ञात चोरटयाने चोरी करुन चोरुन नेल्याचे समजत आहे .

 यावरून केशव क्षीरसागर यांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्या मध्ये अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरट्या विरोधात कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोसई लवटे हे करीत आहेत .

Releated Posts

रांजणगाव MIDC मध्ये देहव्यापारावर धाड; सात महिलांची सुटका, दोन अटकेत

प्रतिनिधी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन आणि दहशतवाद विरोधी शाखेने केलेल्या संयुक्त कारवाईत एका लॉजिंगमध्ये चालणाऱ्या देहव्यापाराचा पर्दाफाश केला…

ByBymnewsmarathi Jun 3, 2026

जुन्नर तालुक्यात दुहेरी हत्याकांड, रात्रीत होत्याच नव्हत झालं..

प्रतिनिधी जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे मढ गावच्या हद्दीत बगाडवाडी येथे तळेरान गावच्या शिवेवर राहत असलेल्या मुकने कुटुंबात अत्यंत…

ByBymnewsmarathi Jun 3, 2026

बारामती तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पोलिसांकडून अवैद्य दारू विक्रेत्यांची धरपकड. हे उशिरा सुचलेले शहाणपण? यामुळे नागरिकांमध्ये वेगळ्याच चर्चा.

संपादक – मधुकर बनसोडे. काही दिवसांपूर्वीच पुणे शहरामधील हडपसर येथे भेसळयुक्त दारू पिल्याने काही नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या…

ByBymnewsmarathi Jun 2, 2026

हुंड्याच्या छळातून १८ वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

प्रतिनिधी पुण्यातील कोथरूड परिसरात हुंड्यासाठी छळ करून १८ वर्षीय विवाहितेची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्यांनी केला…

ByBymnewsmarathi May 12, 2026