मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर!

mnewsmarathi 02 Feb 2024 1 मिनिट वाचन 9,580 वाचन

गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना धमकीचे अनेक फोन येत आहेत. आता मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवले असल्याचा संदेश मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला आहे. याबाबत ANI ने माहिती दिली आहे.

“मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा संदेश आला. संपूर्ण मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे संदेशात म्हटले आहे. या संदेशानंतर मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहे, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं असल्याचं वृत्त ANI ने दिलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह देशभरातील विविध शहरांत बॉम्ब हल्ले होण्याची धमकी दिली जात आहे. तसंच, विमानात बॉम्ब ठेवल्याच्याही धमक्या मिळाल्या होत्या. परंतु, चौकशीअंती हे फोन बोगस असल्याचं स्पष्ट झालं होतं. दरम्यान, आज आलेल्या संदेशाचीही चौकशी सुरू आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi