प्रतिनिधी
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ या पदाच्या भरतीमध्ये माजी सैनिकांसाठी २६ जागा राखीव असून पात्र माजी सैनिकांनी या रिक्त पदांसाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे.
महानगरपालिकेकडील रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात ९ जानेवारी रोजी प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीत मागील अनुशेषाच्या १३ आणि सध्याच्या जाहिरातीतील १३ जागा अशा २६ जागांचा समावेश आहे. https://www.pmc.gov.in/ या संकेतस्थळावर रिक्रुटमेंट या टॅब मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र माजी सैनिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.