Skip to main content

  • Home
  • क्राईम
  • नगर रस्त्यावर गांजा विक्री, उत्तर प्रदेशातील दोघांना अटक
Image

नगर रस्त्यावर गांजा विक्री, उत्तर प्रदेशातील दोघांना अटक

प्रतिनिधी

नगर रस्त्यावर गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून पावणेतीन किलो गांजा, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सागर कुमार (वय २३), शिवम सरोज (वय २२, दोघे मूळ रा. गोरीडी, संत बिरदास नगर, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. चंदननगर भागातील नागपाल रस्त्यावर दोघे जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून सागर आणि शिवम यांना पकडले. त्यांच्याकडील पिशवीची तपासणी करण्यात आली. तेव्हा पिशवीत गांजा आढळून आला. दोघांकडून पावणेतीन किलो गांजा, मोबाइल संच असा ६९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील, सहायक निरीक्षक प्रशांत माने, उपनिरीक्षक अरविंद कुमरे, महेश नाणेकर, विकास कदम, दिलावर सय्यद, श्रीकांत शेंडे, अविनाश संकपाळ यांनी ही कारवाई केली.

Releated Posts

लोणीकंद गोळीबार व सोने चोरी प्रकरणातील फरार आरोपी मध्यप्रदेशमधून २४ तासांच्या आत जेरबंद

प्रतिनिधी लोणीकंद परिसरातील वाडेबोल्हाई येथे एका व्यावसायिकावर गोळीबार करून २२ तोळे सोने जबरीने चोरून नेणाऱ्या कुख्यात आरोपींना पुणे…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला तात्काळ अटक

 प्रतिनिधी :   वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच जीवे मारण्याची धमकी देत…

ByBymnewsmarathi Aug 5, 2026

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा

अक्षय थोरात: महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा

अक्षय थोरात: महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026