मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Monday, 5 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

दोन मित्रांनी अल्पवयीन मुलाची चाकूने भोसकून केली हत्या

mnewsmarathi 06 Feb 2024 1 मिनिट वाचन 9,548 वाचन

प्रतिनिधी

मुलुंड पश्चिम येथे दोन अल्पवयीन मुलांनी चाकूने भोसकून मित्राची हत्या केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. दोन्ही मुलांची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. जुन्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. हत्येनंतर दोन चाकू हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मुलुंड पश्चिम येथील बालाजी मंदिराशेजारी सोमवारी ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत मुलगा १६ वर्षांचा असून तो त्याच परिसरात पदपथावर राहात होता. दोन्ही आरोपी १६ वर्षांचे आहेत. मृत मुलगा व आरोपी मित्र असून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. त्यातून दोन्ही आरोपींनी या मुलाची हत्या करण्याचे ठरवले. दोन आरोपी व मृत मुलामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. त्यातून एकमेकांना शिवीगाळ व मारहाणही करण्यात आली होती. अखेर दोन्ही आरोपींनी चाकूने मित्राच्या पोटावर व पाठीवर वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाला अग्रवाल रुग्णालयात नेण्यात आले. त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. दोन आरोपींपैकी एकाविरोधात यापूर्वी दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. हत्येसाठी वापरण्यात आलेले दोन चाकू पोलिसांनी हस्तगत केले आहेत. दोन्ही मुलांची रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. मृत मुलगा त्याच्या आईसोबत पदपथावर राहात होता. पोलिसांनी स्वतः याप्रकरणी तक्रार दाखल करून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi