Skip to main content

  • Home
  • क्राईम
  • मुंबईत गटारात फेकलेल्या गोणीत सापडलं नवजात बालक, प्राणीप्रेमीच्या ‘या’ कृतीमुळे मिळालं जीवदान
Image

मुंबईत गटारात फेकलेल्या गोणीत सापडलं नवजात बालक, प्राणीप्रेमीच्या ‘या’ कृतीमुळे मिळालं जीवदान

प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून नवजात बाळाला फेकून देण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. मालाडमध्ये एका प्राणीप्रेमी तरुणामुळे एका नवजात बाळाचा जीव वाचला आहे. मालाड पूर्वेत २७ जानेवारी रोजी हा प्रकार घडला. फ्री प्रेसने यासंदर्भातील हे वृत्त दिलं आहे. नेमकं काय घडलं ते पाहुयात.

मालाड पूर्वेत एका उघड्या गटारात टाकलेल्या गोणीतून क्षीण आवाज येत होता. सुरुवातीला संतोष मक्वाना या प्राणी कार्यकर्त्याला वाटलं की यात कुत्र्याची पिल्ले असतील. त्यामुळे त्याने त्याच्या एनजीओच्या हेल्पलाईनवर फोन केला. कुत्र्याच्या पिल्लांना वाचवण्यासाठी त्याने काही स्वयंसेवकांना तिथे बोलावले. स्वयंसेवक तिथे पोहोचल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला. कारण, त्यात एक नवजात बाळ होतं. याप्रकरणी स्वयंसेवकांनी दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले

प्राणी कार्यकर्त्या डॉ. नंदिनी कुलकर्णी यांनी जीविकाच्या निर्धाराचे कौतुक केले. तसंच, वेळेत उपचार पोहोचवल्याने एनजीओ आणि रुग्णालयाचेही आभार मानले. “हॅट्स ऑफ टू जीविका. प्रसारित होत असलेल्या बचाव व्हिडिओवरून हे स्पष्ट होते की ती एक नवजात आहे, तिच्या जन्मानंतर काही तासांनीच तिला सोडलेली आहे,” डॉ. नंदिनी कुलकर्णी यांनी सांगितले.

Releated Posts

लोणीकंद गोळीबार व सोने चोरी प्रकरणातील फरार आरोपी मध्यप्रदेशमधून २४ तासांच्या आत जेरबंद

प्रतिनिधी लोणीकंद परिसरातील वाडेबोल्हाई येथे एका व्यावसायिकावर गोळीबार करून २२ तोळे सोने जबरीने चोरून नेणाऱ्या कुख्यात आरोपींना पुणे…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला तात्काळ अटक

 प्रतिनिधी :   वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच जीवे मारण्याची धमकी देत…

ByBymnewsmarathi Aug 5, 2026

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा

अक्षय थोरात: महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा

अक्षय थोरात: महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026