• Home
  • इतर
  • वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत मध्ये संविधान दिवस साजरा
Image

वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत मध्ये संविधान दिवस साजरा

प्रतिनिधी फिरोज भालदार

आज 26 नोव्हेंबर संविधान दिवस याच निमित्ताने वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत मध्ये संविधान दिवस साजरा करण्यात आला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमाने लिहिलेली भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला अर्पण केली तेव्हापासून हा दिवस ‘ संविधान दिवस ‘ म्हणून संबोधला जातो. याचप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालण्यात आला. निलेश साळवे यांनी संविधानाचे वाचन केले व संविधानाविषयी माहिती सांगितली . यावेळी वडगाव निं . ग्रामपंचायत उपसरपंच संगीता शाह, सदस्य अश्विनी खोमणे ,राजश्री साळवे, प्रमोद किरवे ,निलेश साळवे, व तंटामुक्ती अध्यक्ष माया साळवे , राजुशेठ शहा ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते .

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025