मुख्य मजकुरावर जा
Monday, 7 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 12 February 2024 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

श्री.बा.सा. काकडे(दे) विद्यालयात २००६-०७ इयत्ता दहावी माजी विद्यार्थी मेळावा संपन्न…*

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
February 12, 2024 1 मिनिट वाचन 8,513 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी.
निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात सोमवार दि.१२ /०२ /२०२४ रोजी शैक्षणिक वर्ष २००६-०७मधील इ.१०वी च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न झाला . मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
आलेल्या मान्यवरांचे स्वागत व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.दिपाली ननावरे यांनी केले .त्यांनी आपल्या प्रास्ताविकात माजी विद्यार्थ्यांच्या कार्याची व कर्तृत्वाची ओळख करून दिली.
हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. सतीशभैय्या काकडे दे.यांनी समाधान व्यक्त केले .विद्यालयाचे माजी विद्यार्थी औद्योगिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, अशा अनेक क्षेत्रात आपले कार्य पार पाडत आहेत याचे अध्यक्षांना कौतुक वाटले व ज्या हेतूने विद्यालय स्थापन केले तो हेतू सार्थकी लागला असे ते आपल्या मनोगता मध्ये म्हटले.
यावेळी २००६-०७ बॅचमधील प्रज्ञा काकडे, रेश्मा सय्यद, सुप्रिया गायकवाड, कल्याणी जगताप, राजेश जगताप, विशाल ननावरे, विशाल पवार ,शैलेश बनसोडे, दीपक दंडवते, स्वप्निल जाधव ,निलेश गुरव या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम घडवून आणला .या वेळी २००६-०७ या बॅचच्या विद्यार्थ्यांनी कपाट भेट दिले त्याचा स्वीकार संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सतीशभैय्या काकडे दे., उपाध्यक्ष मा. श्री.भीमराव बनसोडे सर,मानद सचिव मा.श्री.मदनराव काकडे दे., मुख्याध्यापिका सौ.ननावरे मॅडम व शिक्षक वर्ग यांनी केला.
या कार्यक्रमाचे नियोजन श्री. येळे सर यांनी केले. सूत्रसंचालन राजेश जगताप यांनी केले तर आभार रेश्मा सय्यद हिने मानले.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख