• Home
  • इतर
  • वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन युवा आघाडी परळी शहराच्या वतीने संविधान दिनी विविध कार्यक्रम संपन्न
Image

वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन युवा आघाडी परळी शहराच्या वतीने संविधान दिनी विविध कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी

वंचित बहुजन युवा आघाडी परळी शहराच्या वतीने संविधान दिनी विविध कार्यक्रम संपन्न झाले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गफार खान व युवा आघाडीचे परळी शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की श्रद्धेय बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशावरून व वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या सूचने नुसार व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय शैलेश भाऊ कांबळे बीड पूर्व वंचित बहुजन युवा आघाडीचे दबंग जिल्हाध्यक्ष आदरणीय भगवंत आप्पा वायबसे व वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब जगतकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान दिन हा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला असून या निमित्त वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन युवा आघाडी परळी शहराच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले असून यानिमित्त संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन व वाटप करुण संविधानामुळे भारतीय महिलांचा झालेला विकास व धर्मनिरपेक्षता आणि भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमास संविधानावर मार्गदर्शन करण्यासाठी प्राचार्य कमलाकर कांबळे ज्येष्ठ विचारवंत तथा अध्यक्ष बौद्ध साहित्य परिषद. माननीय सौ सीता ताई बनसोड नगराध्यक्षा केज शहर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एडवोकेट अनंतराव जगतकर हे होते तर प्रमुख उपस्थितीत भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा प्रजावतीताई कांबळे माननीय रानबा गायकवाड लेखक साहित्यिक संपादक पत्रकार. प्राध्यापक विलास रोडे .प्राध्यापक डॉक्टर यशश्री बालासाहेब जगतकर आधुनिक लहू सेनेच्या परळी तालुकाध्यक्षा कल्पनाताई कांबळे तर या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव मा. मिलिंद घाडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते अशी ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश जगतकर तर प्रस्ताविक वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गफारखान तर आभार प्रदर्शन वंचित बहुजन युवा आघाडीचे परळी शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी केले असून या कार्यक्रमास शहरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष संदीप ताटे वंचित बहुजन युवा आघाडीचे शहर उपाध्यक्ष शुभम सावंत वंचित बहुजन व आघाडीचे परळी शहर महासचिव विनोद रोडे युवा गाडीचे तालुका संघटक भिमराव कसबेतर या कार्यक्रमास जतीन जगतकर जयपाल जगतकर चेतन ताटे कल्याण ताटे संजय कांबळे आकाश आदोडे इत्यादी सह अनेक महिला नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025