• Home
  • क्राईम
  • वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शेतकऱ्याला लाचेत मागितले २० किलो तांदूळ
Image

वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शेतकऱ्याला लाचेत मागितले २० किलो तांदूळ

प्रतिनिधी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दोन – लाचखोरांना दोन वेगवेगळ्या कारवाईत अटक केली. विशेष म्हणजे एका लाच प्रकरणात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी २० किलो तांदूळ व दीड हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली.राजुरा तालुक्यातील शेतकऱ्याने – शेतात पाणीपुरवठा करण्यासाठी विद्युत पंपाची – व्यवस्था केली होती. मात्र, पंपासाठी थ्री फेज विद्युत पुरवठा असण्याची गरज असते. फिर्यादी व इतर शेतकऱ्यांचे शेत विरुर महावितरण कार्यालय अंतर्गत येते व विद्युत पुरवठा सुरळीत चालू ठेवण्याचे काम राजुरा उपविभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ शालेंद्र देवराव -चांदेकर यांच्या अंतर्गत येते. विद्युत पुरवठा सुरळीत -सुरू ठेवण्यासाठी चांदेकर यांनी फिर्यादी व इतर शेतकऱ्यांना प्रत्येकी २० किलो तांदूळ व दीड हजार रुपये असे एकूण ७ हजार ५०० रुपयांची मागणी केली होती. पैसे देण्याची इच्छा नसलेल्या फिर्यादीने – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. – शुक्रवारी चंद्रपूर लाचलुचपत विभागाने सापळा रचत ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शालेंद्र चांदेकर यास अटक केली. आरोपी विरुद्ध बल्लारपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीची पडताळणी झाल्यावर चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला, तडजोडीअंती ग्रामसेवक टेंभुर्णेला लाचेची रक्कम स्वीकारताना अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, संदेश वाघमारे, वैभव गाडगे, राकेश जांभुळकर, रोशन चांदेकर, मेघा मोहूले, हिवराज नेवारे, प्रदीप ताडाम, पुष्पा काचोळे यांनी केली. दुसऱ्या प्रकरणात ब्रह्मपुरी तालुक्यातील झिलबोडीचे ग्रामसेवक पुरुषोत्तम यशवंत टेंभुर्णेला १० हजार स्वीकारताना अटक करण्यात आली. फिर्यादी ठेकेदारीचे काम करतो. जि. प. अंतर्गत १५ व्या वित्त आयोगातून २०२१ ते २०२२ दरम्यान जि. प. प्राथमिक शाळेचे शौचालय, मुतारी, घर बांधकाम व अंगणवाडी शौचालय, किचन शेड व मुतारीचे काम केले होते. त्या कामाचे फिर्यादीला ३ लाख ९० हजार रुपये ग्रामसेवक टेंभुर्णेयाने धनादेशद्वारे दिले होते. याचा मोबदला म्हणून १५ हजाराची लाच मागितली. फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर ही कारवाई केली.

Releated Posts

कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; महामार्गावर बस लुटणारी टोळी गजाआड, सव्वा कोटींची चांदी जप्त

प्रतिनिधी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर धाडसी दरोडा टाकून कुरियर बसमधील सव्वा कोटींची चांदी लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा कोल्हापूर पोलिसांनी…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

बारामतीत गुन्हेगारांची गय नाही! सराईत गुंडांवर तडीपारीची कुऱ्हाड; पोलिसांचा कडक पवित्रा

प्रतिनिधी ​दहशत माजवणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले; नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम बारामती शहर आणि तालुक्यात वारंवार गंभीर गुन्हे…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025

बारामतीत पोलिसांचा थरार; धारदार शस्त्रांसह सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

प्रतिनिधी ​दहशत पसरवण्याचा प्रयत्न फसला; पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई बारामती शहर आणि परिसरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने घातक शस्त्रे…

ByBymnewsmarathi Dec 22, 2025

बारामतीत पोलिसांचा ‘महामोहीम’ तडाखा; गुणवडी, जळोचीसह नीरा वागजमधील अवैध धंदे उद्ध्वस्त

प्रतिनिधी ​१५ जणांवर गुन्हे दाखल; ५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, गावठी दारूचे रसायन केले नष्ट बारामती शहर आणि…

ByBymnewsmarathi Dec 22, 2025