मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Thursday, 20 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

एकतर्फी प्रेमाची अशीही तऱ्हा! प्रेमवीराचा तरुणीच्या दुचाकीला ‘जीपीएस’ लावून पाठलाग

mnewsmarathi प्रतिनिधी
February 19, 2024 1 मिनिटांचे वाचन 5001 वेळा पाहिले

प्रतिनिधी

एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या नकळत तिच्या दुचाकीला जीपीएस यंत्र लावून तिचा पाठलाग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी बारामतीतील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लखन महादेव भिसे (वय २५ रा. पिंपळी, ता. बारामती, जि. पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.

या बाबत एका तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार शुक्रवार पेठेतील एका सोसायटीत राहायला आहे. आरोपी भिसे तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. त्याने तरुणीवर पाळत ठेवण्यासाठी तिच्या नकळत दुचाकीला जीपीएस यंत्र लावले.

तरुणीवर तो पाळत ठेवत होता. तिचा चोरून पाठलाग करायचा. तरुणीच्या लक्षात हा प्रकार आला. तेव्हा तिने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक स्वाती भोरड तपास करत आहेत.

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा