• Home
  • क्राईम
  • आंध्र प्रदेशातून बारामतीला जाणारा एक कोटीचा गांजा साठा पकडला
Image

आंध्र प्रदेशातून बारामतीला जाणारा एक कोटीचा गांजा साठा पकडला

प्रतिनिधी

आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात बारामतीकडे होणारी गांजासारख्या अंमली पदार्थाची तस्करी सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडली. या कारवाईत ४५९ किलो ३४० ग्रॅम गांजा जप्त करून चौघाजणांना अटक करण्यात आली आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर कोंडी (ता. उत्तर सोलापूर) येथे ही कारवाई करण्यात आली. आंध्र प्रदेशातील श्रीकुलम येथून गांजा वाहतूक करणारी मोटार सोलापूरमार्गे बारामतीकडे जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर कोंडी येथे सापळा लावण्यात आला. यात अशोक लेलॅन्ड पिक अप वाहनातून (एमएच.४२ बीएफ १९२६) ४५९ किलो ३४० ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. त्याची बाजारातील किंमत एक कोटी ४६ हजार ९०० रूपये एवढी दर्शविण्यात आली आहे.

मोटारचालक अल्ताफ युनूस इनामदार (वय ३८, रा. पिंपळी, ता.बारामती) व जमीर इब्राहीम शेख (वय ३५, रा. सिध्देश्वर गल्ली, बारामती) यांसह अन्य दोघांना अटक झाली असून मुख्य सूत्रधार मानला जाणारा लाला बागवान याचा शोध घेण्यात येत असल्याचे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी मोडनिंब येथेही गांजा तस्करी पकडण्यात आली होती. त्यावेळी दोन मोटारींतून १०५ किलो ३८० ग्रॅम गांजासह एकूण ३६ लाख ३६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. हा गांजा ओडिशा येथील गुणपूर येथून अकलूजकडे नेण्यात येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

Releated Posts

दोन गावठी पिस्तूल, एक रायफलसह आरोपी जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन काडतुसांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

रागाच्या भरात नातवाने आजोबांचा लोखंडी गजाने केला खून; आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी   शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शेतातील व घरातील कामे सांगितल्याच्या रागातून २६ वर्षीय नातवाने ८४ वर्षीय…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक- अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका…

ByBymnewsmarathi Jun 14, 2026

ऑनलाईन गेमिंगच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पुणे पोलिसांनी मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश

प्रतिनिधी ऑनलाईन गेम खेळून अल्पावधीत मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या सायबर…

ByBymnewsmarathi Jun 13, 2026