• Home
  • इतर
  • बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशन वरील फुटओव्‍हर ब्रिज कोसळल्याच्या प्रकरणाची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने घेतली दखल
Image

बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशन वरील फुटओव्‍हर ब्रिज कोसळल्याच्या प्रकरणाची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने घेतली दखल

पालकमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना चौकशीचे आदेश

शासन स्तरावरुन मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करणार : सुधीर मुनगंटीवार

दि. 27 नोव्हेम्बर रोजी संध्याकाळी बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशनवरील फुटओव्‍हर ब्रिजचा एक भाग कोसळल्याने जवळपास १३ जण जखमी झाल्‍याचे प्रथम दर्शनी कळले. या सर्वांना तातडीची मदत करीत रेल्‍वे प्रशासन व पोलिस प्रशासनाने रूग्णवाहिके द्वारा रुग्णालयात पोहचवून त्‍यांच्‍यावर तातडीने उपचार सुरु झाले आहेत. यापैकी काही रुग्‍णांना चंद्रपूर येथील जिल्‍हा सामान्य रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. ही बातमी कळताच राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री व चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी त्वरित दखल घेत त् सर्व जखमींना आवश्‍यक त्‍या सर्व सुविधा पुरविण्‍याचे निर्देश जिल्‍हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला दिले. तसेच या घटनेची संपूर्ण चौकशी करण्‍याचे निर्देश ना. मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचे जिल्‍हाधिकारी श्री विनयकुमार गौड़ा तथा पोलिस अधिक्षक श्री परदेशी यांना दिले आहेत. अपघातानंतर लगेचच भाजपाचे बल्‍लारपूर येथील पदाधिकारी रेल्‍वे स्‍टेशनवर पोहचून त्‍यांनी जखमींना ताबडतोब मदत केली. या प्रकरणी शासन स्तरावरुन मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025