• Home
  • क्राईम
  • धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थिनीवर जंगलात नेऊन बलात्कार
Image

धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थिनीवर जंगलात नेऊन बलात्कार

प्रतिनिधी

 ज्या स्कूलबसमधून मुलगी शाळेत जात होती, त्याच स्कूलबसवरील चालकाचा मित्र असलेल्या युवकाने दहाविच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला रात्रीच्या सुमारास जंगलात नेऊन बलात्कार केला. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. श्याम उर्फ बिट्टू प्रशांत बेलखोडे (२४) रा. जलारामनगर, खरबी रोड, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

पीडित १५ वर्षीय मुलगी ही दहावीची विद्यार्थिनी आहे. बिट्टू हा ड्रायव्हरचे काम करतो. बिट्टूचा एक मित्र स्कूल बस चालवतो. त्याच्या बसमधून पीडित मुलगी शाळेत येणे-जाणे करीत होती. बिट्टू हा नेहमी स्कूलबसवर मित्रासोबत येत होता. या दरम्यान तिची बिट्टूशी ओळख झाली. बिट्टू नेहमी तिच्याशी गोड-गोड बोलत होता. दरम्यान, तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. १९ जानेवारीला बिट्टूने मुलीला पाणीपुरी खाण्यासाठी हसनबाग परिसरात बोलावले.

रात्री ८ वाजताच्या सुमारास ती त्याला भेटण्यासाठी हसनबाग परिसरात गेली. तेथून बिट्टू तिला दुचाकीवर बसवून वाठोडा कुलर कंपनीजवळील जंगलात निर्जनस्थळावर घेऊन गेला. तेथे त्याने तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध ठेवले. याबाबत वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरामुळे मुलगी घाबरलेली होती. तिचा स्वभाव बदलला होता. ती कोणाशीच बोलत नव्हती. मुलीची ही अवस्था पाहून आईने तिला विश्वासात घेत विचारपूस केली. तिने बिट्टूने जबरीने लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. वाठोडा पोलिसात घटनेची तक्रार करण्यात आली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून बिट्टूला अटक केली.

Releated Posts

15 वर्षांनी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय कस्टडीत मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना दिली जन्मठेप शिक्षा.

प्रतिनिधी पोलीस कोठडीत संशयिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय देत रिसोड…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

अवैध हातभट्टी बंद… मात्र परवानाधारक दारूच्या अवैध विक्रीला उधाण?

प्रतिनिधी एक्साईज विभाग आणि पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष हडपसर परिसरात अवैध दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्यभरात पोलिस…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह आश्रय देणाऱ्या इसमाला गुन्हे शाखा युनिट-५ कडून अटक!

प्रतिनिधी: वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यात गेल्या १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला आणि त्याला आश्रय…

ByBymnewsmarathi Jul 2, 2026

​मेढद येथे माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई; साडेतीन लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

सहसंपादक- अक्षय थोरात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल आणि अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या आदेशानुसार, माळेगाव…

ByBymnewsmarathi Jul 1, 2026