तासगाव प्रतिनिधी.
शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सावळज येतील रत्नदीप पब्लिक स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात बक्षीस वितरणाने करण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत प्राचार्य वृषाली धेंडे मॅडम यांनी केले. तसेच प्रमुख अतिथी यांची प्रस्तावना भाग्यश्री आवटे यांनी मांडली. यावेळी दीप प्रज्वलन आणि नटराज पूजनाने प्रमुख अतिथी सुशांत भिसे ,नवोदित वकील प्रणील भिसे आणि स्कूलचे कमिटी मेंबर्स ,प्राचार्य, शिक्षक वृंद आणि पालकांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. पवन भिसे यांनी सत्कार समारंभाचे आयोजन केले. शाळेचे चेअरमन प्रवीण गोडबोले यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले .यावेळी बालचमूनी वेगवेगळे नृत्य प्रकार सादर केले .लहान वयोगटातील मुलांनी केलेल्या विविध नृत्य कलाकारीस परिसरातून कौतुक होत आहे. पालकांनीही यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला आणि कार्यक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली कांबळे मॅडम यांनी केले . पारंपारिक त्यापासून आधुनिक नृत्य प्रकारापर्यंतचे वेगवेगळे नृत्य यावेळी सादर केले. कार्यक्रमाचे संयोजन शाळेचे चेअरमन, प्राचार्य ,शिक्षक वृंद आणि बस्तवडे शाळेचे शिक्षक , मदतनीस रेखा कांबळे सुव्यवस्थित प्रकारे केलेले दिसून येते. सर्वांनी या कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केले आणि शाळेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेचे चेअरमन प्रवीण गोडबोले यांनी आभार प्रदर्शनाद्वारे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
रत्नदीप पब्लिक स्कूल ,सावळज.